अहमदनगर : आगरकर समर्थकांची उचलबांगडी

केडगाव, भिंगार भाजप मंडलावर गांधी समर्थकांची वर्णी

0

अहमदनगर : खासदार दिलीप गांधी यांनी शहरजिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षांतर्गत विरोधक अ‍ॅड. अभय आगरकर यांचे खच्चीकरण सुरू केले आहे. तत्कालीन भाजप शहराध्यक्ष आगरकर यांनी नियुक्त केलेल्या साहेबराव विधाने, महेश नामदे यांची उलचबांगडी करून गांधी यांनी त्या जागेवर स्वत:च्या समर्थकांची वर्णी लावली.

भिंगार मंडलाध्यक्षपदी शिवाजी दहिहंडे तर केडगाव मंडलाध्यक्षपदी शरद ठुबे यांची नियुक्ती गांधी यांनी केली आहे. आगरकर शहरजिल्हाध्यक्ष असताना त्यांनी साहेबराव विधाते यांच्याकडे केडगाव तर महेश नामदे यांच्याकडे भिंगार भाजप मंडलाची जबाबदारी दिली होती. खासदार गांधी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नरेंद्र कुलकर्णी यांना मध्यनगर मंडलाध्यक्ष केले. त्यानंतर नगरसेवक किशोर डागवाले यांना भाजप प्रवेश देत जिल्हा उपाध्यक्ष केले. आगरकर यांना शह देण्यासाठी गांधी यांनी डागवाले यांचा ‘ओबीसी’ चेहरा समोर आणला. आता विधाते, नामदे यांची उलचबांगडी
करून तिसरा धक्का आगरकर यांना दिला.
शहर कार्यकारिणीमध्येही खासदार गांधी यांनी काही बदल केले आहेत. उपमहापौर श्रीपाद छिंदम, सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, उपाध्यक्ष किशोर डागवाले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर, गौतम दीक्षित, उपाध्यक्ष श्रीकांत छिंदम, धनंजय जामगांवकर, नितीन शेलार, केडगांव नूतन अध्यक्ष शरद ठुबे, भिंगार मंडल नुतन अध्यक्ष शिवाजी दहिहंडे यावेळी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे नुकतीच आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीत त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे शहरातील मंडल अध्यक्ष बदलण्याचा निर्णय शहराध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी घेतला असल्याचा दावा गांधी यांनी केला आहे.

अ‍ॅड.राहुल रासकर, रविंद्र बारस्कर, विश्वनाथ पोंदे, तुषार पोटे, नितीन जोशी, विजय कुंजीर, दिपक दहिफळे, संतोष शिंदे, प्रा.सुनिल पंडित, संजीव सातपुते, किशोर कटोरे, गणेश साठे, राजेंद्र काळे, डॉ.झुंझारराव झांजे, सुनिल कुलकर्णी, सचिन दळवी, मुकुल गंधे, हेमंत दंडवते, बाळासाहेब भोरे, वल्लभ कुसकर, शुभम शेलार, स्वप्नील सोनवणे, विजय सामलेटी, अक्षय भालेराव, अविनाश साखला, अमृत गुगळे, गणेश शिंदे, सागर गोरे, प्रतिक बारसे, गौरव गुगळे, लक्ष्मीकांत तिवारी, विठ्ठल कोतकर, संतोष शिरसाठ, जालिंदर तनपुरे, जालिंदर शिंदे, डॉ.अजित फुंदे, बबन शिंदे, विरेश क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शहर कार्यकारीणीची नवे कारभारी
सरचिटणीस – गौतम दीक्षित व जगन्नाथ निंबाळकर, उपाध्यक्ष – श्रीकांत छिंदम व धनंजय जामगांवकर, चिटणीस – भरत सुरतवाला, युवा मोर्चा सरचिटणीस – महेश सब्बन, उपाध्यक्ष – शिवाजी अनभुले, शहर जिल्हा शिक्षक आघाडी अध्यक्ष – संजय सातपुते, केडगांव मंडल उपाध्यक्ष – बाळासाहेब सातपुते, सरचिटणीस – सचिन चोरडिया, ओबीसी मोर्चा चिटणीस – सुमित देवतरसे

 

LEAVE A REPLY

*