अहमदनगर : शहर महिला आघाडीची आढावा बैठक संपन्न

0

अहमदनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे राजकारणामध्ये सक्रीय होऊन समाजकार्य करण्याची महिलांना मोठी संधी आहे.आगामी काळात नगरमध्ये महापालिका निवडणूका होत आहेत, या निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त भाजपाच्या महिला उमेदवार विजयी होतील, यासाठी महिला आघाडीने आतापासूनच नियोजन करावे.

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची दखल घेणारा पक्ष आहे. त्यामुळे महिला आघाडीने मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान राबवून जास्तीत जास्त महिलांचा सक्रिय सहभाग वाढवावा.

कोपर्डी सारखी घटना ही समाजाला कलंक लावणारी आहे. मात्र तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली गेल्याने नगरच्या निर्भयाला न्याय मिळाला आहे. हा न्याय मिळवून देणारे न्यायाधिश सुवर्णा केवले, विशेष सरकारी वकिल उज्वल निकम व सर्व पोलिस अधिकार्‍यांचे महिला आघाडीच्यावतीने विशेष आभार व अभिनंदन. भाजपाच्या काळात राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधीत असून, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. कोपर्डी सारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी महिलांमध्ये जावून स्वसंरक्षणाबद्दल जनजागृती करावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला आघाडीच्या निरिक्षिका डॉ.तृप्ती परदेशी यांनी केले.

शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या आढावा बैठकीनिमित्त डॉ.तृप्ती परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालयात शहर महिला आघाडीची बैठक झाली. महिला आघाडीच्या शहराध्यक्ष व माजी उपमहापौर गितांजली काळे यांनी डॉ.तृप्ती परदेशी यांचे स्वागत करुन सत्कार केला.

याप्रसंगी माजी अध्यक्षा सुरेखा विद्ये, भिंगार कॅन्टोंमेंट बोर्ड नगरसेविका शुभांगी साठे, नगरसेविका मालन ढोणे, वंदना पंडित, निर्मला भंडारी, ज्योत्स्ना कुलकर्णी, लिलावती अगरवाल, सविता तागडे, कुमुदिनी जोशी, मीरा महाजनी आदिंसह महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*