अहमदनगर : 13 फितूर साक्षीदारांवर कारवाई करणार; सरकारी वकील रामदास गवळी यांची माहिती

0
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन राजू आगे या अल्पवयीन मुलाचा खून केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची मुक्तता केली.
या खटल्यातील 13 जणांना फितूर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या फितूर साक्षीदारांवर कलम सेशन्स कोर्टामध्ये 193 नुसार करवाई करणार असल्याची माहिती सरकारी वकील रामदास गवळी यांनी दिली.
नितीन आगे खून प्रकरणात न्यायालयाने एकूण 26 साक्षीदार तपासले असून एकूण 13 साक्षीदार हे फितूर झाले आहे.
फितूर झालेल्या साक्षीदारामध्ये अशोक विठ्ठल नन्नवरे, रावसाहेब उर्फे बब्लू अण्णासाहेब सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, सदाशिव मुरळीधर दाडर, विष्णू गोरख जोरे, राजेंद्र बाजीराव गिते, बाळू ज्ञानेश्वर जोट, रमेश भगवान काळे, सदाशिव अश्राबा वडशिळ, विकास कचरू दांडर, हनुंमत परमेश्वर मिसाळ, राजू सदूम जाधव, साधना मारूतीराव खडतरे आदी साक्षीदार फितूर झाले आहे. यातील पहिले आठ साक्षीदार यांनी 164 नुसार न्यायालयात जबाब दिले आहे. मात्र ते देखील फितूर झाले या सर्वां साक्षीदार 193 नुसार कारवाई नगर येथील सेशन्स कोर्टामध्ये दाखल करणार असल्याचे सरकारी वकील रामदास गवळी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*