अहमदनगर : 32 व्या किकबॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन

0

अहमदनगर : नगर जिल्हा अमेचर स्पोर्टस किकबॉक्सिंग असो.ने आयोजलेल्या 32 व्या जिल्हास्तरीय कॅडेट चॅपियन शिप 2017 या किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मॅचेस लावून झाले. यावेळी ललित गुंदेचा, उद्योजक मनीष आहुजा, भाजपा युवा मोर्च्याचे शहराध्यक्ष नितीन शेलार, भाजप युवा मोरच्याचे राज्य खजिनदार तुषार पोटे जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा, आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शेलार, जालिंदर शिंदे, सुमित बटुळे, सागर उकिरडे, किरण लटपटे, मोईन शेख, संकेत चव्हाण सौरभ टाकेल आदी उपस्थित होते.
स्पर्धेत नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धा 14, 17 व 19 वर्षाखालील गटात घेण्यात आल्या यातून विजयी होणारे स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातील.
निलेश शेलार यांनी आपल्या प्रास्तविकात स्पर्धेविषयी माहिती देऊन ते म्हणाले अनेक खेळाडू राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय खेळासाठी निवड होते पण खेळाडू केवळ आर्थिक पाठबळ अभावी पुढे जात नाही, शहरातील विविध संस्थांनी त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
गुंदेचा यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन खेळामुळे शरीराबरोबर मनही ताकदवान बनते त्यासाठी प्रेतकाने एकतरी खेळ खेळाला पाहिजे त्यासाठी पालकांनी मुलांना जसे 3 वर्षाचा असताना बालवाडीत पाठवता तसे खेळायला पण पाठवले पाहिजे.
तुषार पोटे म्हणाले सध्या मुले मैदानावर कमी व मोबाइलवर गेम खेळताना दिसतात पण शेलार बंधू हे पहिल्या पासूनच मुलांना खेळांसाठी प्रोत्साहन देत आहे. स्वतः त्याच्याबरोबर प्रॅक्टिसला असतात. जीवनात मानसिक व शारीरिक तंदुरस्त राहावयाचे असेल तर कोणताही खेळ खेळला पाहिजे व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
स्पर्धा यशस्वितेसाठी गणेश कुसळकर, सचिन मकासरे, सचिन शेलार, महेंद्र कुसळकर, कौस्तुभ खेडकर, गोपाल कोंडाल, मोहित गांधी यांच्यासह असो.च्या खेळाडूंनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

*