अहमदनगर : ‘थ्री इडियट्स’चा उद्या नगरमध्ये प्रयोग

0

अहमदनगर : खळखळून हसवणार्‍या थ्री इडियट्स या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (दि. 8) नगर शहरात माऊली सभागृहात होत आहे.

या नाटकात शितल परदेशी, फिरोज काझी, हय्युम शेख, दादा नवघरे आणि अजय केदार हे कलाकार आहेत. धुंद करणारे नृत्य, विनोदाचा अफ़लातून टाइमिंग आणि चढ़त जाणारी नाटकाची रंगत यात भरभरुन पाहायला मिळते.
मराठी माणूस नाट्य वेडा आहे अस म्हणतात ते काही चुकीच् नाही.

मराठी रंगभुमीवरील एकापेक्षा एक उत्कृष्ट कलाकृती याचीच साक्ष देतात. रंगभूमी वरील असाच एक अफ़लातून आविष्कार म्हणजे थ्री इडियट्स हे नाटक.

फिरोज काझी लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती एफ के क्रिएटिव्ह क्रिएशन या शेवगावच्या संस्थेने केली आहे.

सहपरिवार बघण्यासारखे हे एक धम्माल विनोदी नाटक आहे. नगर सारख्या ग्रामीण भागातून व्यावसायीक नाटकाची निर्मिती होणे ही नगर जिल्ह्यासाठी नक्कीच भूषणावह बाब आहे. हे नाटक रंगभूमीच्या अनेक पांरपारिक चौकटी मोडून थेट महाराष्ट्र शासनाची व्यावसायीक नाट्य स्पर्धा,झी नाट्य गौरव, म.टा.सन्मानापर्यन्त जाऊन धड़कले.

मुंबई,कल्याण ,ठाणे, ओरंगाबाद, पुणे इत्यादी ठिकाणी हाउस्फुल्ल प्रयोग सादर झाले. आपण अनेक वर्षापासून कार्टून फ़िल्म पाहातच मोठे झालो आहोत. पण कार्टून प्ले (वाचिक अभिनयासोबतच आंगिक आभिनयाला वाव देणारे नाटक) ही संकल्पना रंगभूमी वर आणन्याचे श्रेय या थ्री इडियट्स नाटकाला जाते.

LEAVE A REPLY

*