अहमदनगर : 35 ख्रिस्ती भाविक इस्राइलला रवाना

0

अहमदनगर : शहरातील 35 ख्रिस्ती समाजबांधव प्रभु येशु ख्रिस्तांची जन्मभुमी असलेल्या ईस्राइल देशासाठी रवाना झाले आहेत. शहरासह देशात शांतता नांदावी यासाठी सदर भाविक प्रार्थना करणार आहेत.

ईस्राइलला जाणार्‍या भाविकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष जॉय लोखंडे व बबलू जाधव यांनी त्यांचा सत्कार करुन निरोप दिला. यावेळी जितू वाकोडे, अमित गायकवाड, हेमंत रोकडे, निलेश मकासरे आदि ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

पास्टर सुनिल गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक धार्मिक यात्रेसाठी रवाना झाले आहेत. अकरा दिवसीय यात्रेत भाविक प्रभु येशुंची जन्म व कर्मभुमी स्थळी भेट देणार आहेत.

जॉय लोखंडे म्हणाले की, प्रभु येशु ख्रिस्तांचे जन्मस्थळ असलेल्या पवित्र भुमीत जाण्यासाठी नशीब लागते. पैसे असून देखील अनेकांना तेथे जाता येत नाही. प्रभु येशू मानव जातीच्या कल्याणासाठी क्रुसवर खिळले गेले.

मानव जातीच्या उध्दारासाठी त्यांनी दाखविलेला सत्याच्या मार्गावर चालण्याची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पास्टर सुनिल गंगावणे यांनी प्रार्थना करुन यात्रेला भाविक प्रस्थान झाले.

LEAVE A REPLY

*