जिल्ह्यात हुडहुडी : थंडीचा पारा 11.6 अंशांवर

0
अहमदनगर – परतीच्या पावसाने बायबाय केल्यानंतर थंडीने नगरकरांना सुरवातीलाच हैराण करून सोडले आहे. चौथ्यांदा राज्यात निच्चांकी तापमान नगरमध्ये 11.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
हा या हंगामातील विक्रम आहे. यापूर्वी मंगळवारी 12.3, बुधवारी 12.7, 30 ऑक्टोबरला 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
आता राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद नगरमध्ये होऊ लागल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या व अन्य गरम कपड्यांना मागणी वाढली असून रात्री व सकाळी रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. थंडी गहू व हरभरा पिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याने पेरणीची लगबग सर्वत्र सुरू आहे.

LEAVE A REPLY

*