Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगरमध्ये गँगरेप

Share

माजी महापौरांसह 9 जणांवर गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून 30 वर्षीय आदिवासी महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नऊ जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 376 ड नुसार सामुदायिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेनेचे नगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचा समावेश आहे. फुलसौंदर यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच नगर शहरात व  जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात माजी महापौर फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर (सर्व रा. बुरुडेमळा, नगर) व त्यांचे सोबत अनोळखी 5 इसमांचा समावेश आहे. याबाबत पीडित आदिवासी महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 12 ऑगस्टरोजी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान बुरुडगाव रोड येथील पडीक रानात ती बकर्‍या चारीत होती. त्यावेळी भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोक तेथे आले. तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबतच जागेचा वाद मिटवायचा आहे की नाही, असे म्हणत आरोपींनी महिलेस लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली.

मारहाणीमुळे ती महिला अर्धवट बेशुद्ध पडली. त्यानंतर गणेश फुलसौंदर व महेश फुलसौंदर यांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी इतरांनी घेराव घातला व त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यास तुला व तुझे कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संबंधीत महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायदा व सामुहिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करत आहे.

फुलसौंदरच्या मदतीला आ. जगताप
कोतवाली पोलीस ठाण्यात माजी महापौर फुलसौंदर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात आ. जगताप यांनी भगवान फुलसौंदर व इतरांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा जागेच्या वादातून करण्यात आला असून तो खोटा आहे. फुलसौंदर यांची पार्श्वभूमी तपासल्यास ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतात. नगर शहराचे प्रथम महापौर म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे. त्यांचे समाजात चांगले स्थान आहे. त्याच्यावर दाखल गुन्हा खोटा असून त्याची योग्य चौकशी करावी, त्यांचेवर अन्याय होणार नाही, याचा सहानभुतीपुर्वक विचार करत जिल्हा पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. यापुढे एखाद्या राजकीय, सामाजिक, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांची कारकीर्द संपविण्याच्यादृष्टीने असले प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी शक्यता आ. जगताप यांनी वर्तवली आहे.

मी निर्दोष : फुलसौंदर
पूरग्रस्तांसाठी नगरमधून जमा झालेली मदत घेऊन मी शनिवारी रात्री सांगली येथे आलो आहे. मला मित्र व नातेवाईक यांच्याकडून समजले की, आमच्या परिसरातील एका कुटुंबाकडून माझ्या व नातेवाईकांच्या विरोधात पोलिसात खोटी फिर्याद दाखल केली आहे. वास्तवात माझा व त्या फिर्याददार महिलेचा काहीही संबंध नाही. मी संबंधित महिलेला ओळखत देखील नाही. माझे राजकारण संपविण्यासाठी हे कटकारस्थान रचण्यात आले आहे. यापूर्वी संबंधित कुटुंबातील लोकांनी या परिसरात व्यापार्‍यांच्या विरोधात खोट्या फिर्यादी दाखल करत पैसे उकळलेले आहेत. घटना घडली त्या दिवशी मी घरीच होतो. त्याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत. न्यायालयात हे सर्व सिध्द् होणारच आहे. जो आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करत आहे त्याला नगरकरच उत्तर देतील, असा खुलासा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!