Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर, पाथर्डीत मुसळधार

Share

चर्चा मात्र विमानाच्या घिरट्यांची अन् कृत्रिम पावसाची

अहमदनगर, कोरडगाव (प्रतिनिधी)- नगर शहर उपनगर आणि तालुक्यात तसेच पाथर्डीच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला. पण त्यापूर्वी विमानाने घातलेल्या घिरट्या अन् कृत्रिम पावसाची चर्चा चांगलीच रंगली होती. सोशल मीडियावरही याबाबतचे फोटो शेअर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाशी संपर्क करण्यात आला. पण त्यांनी यास दुजोरा दिला नाही.

बुधवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून नगर शहर व परिसरात ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस झाला. पण त्यापूर्वी विमान गेल्याने हा कृत्रिम पाऊस असावा अशी चर्चा रंगली होती. याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातही आला. पाथर्डीच्या पूर्वभागामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी औरंगाबादच्या दिशेने आलेल्या 3 विमानांमधून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याची चर्चा होती. सायंकाळी 6 च्या सुमारास उत्तरेकडून औरंगाबादच्या दिशेने आलेल्या तीन विमानांनी पर्जन्य पाडण्यासाठी अनुकूल असलेल्या ढगांवर प्रक्रीया केल्यानंतर अर्ध्या तासात पाऊस सुरू झाला. परिसरातील खरवंडी,कोरडगाव, चिंचपूर इजदे आदी पूर्वभागांमध्ये चांगल्याप्रकारे सुमारे 1 तास पाऊस सुरू होता. या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांना मोठे जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. याप्रकरणी प्रशासनाकडे काहीही माहिती नव्हती. त्यामुळे हा पाऊस नैसर्गिक की कृत्रिम याबाबत चर्चा सुरूच होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!