Type to search

Featured सार्वमत

नगरकरांनो, आय लव्ह यू…!

Share

करिष्माचा करिष्मा पाहण्यासाठी नगरकरांची तोबा गर्दी : मुंबईच्या गोविंदांना एक लाख 11 हजारांचे बक्षीस

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरात दहिहंडी उत्सवाला दिवसेंदिवस जोश येत आहे. त्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने दहिहंडीचे निमित्त साधत सोमवारी शक्तीप्रदर्शन केले. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठान सुप्रसिध्द तारका करिश्मा कपूरला नगरला बोलविले होते. सोमवारी रात्री करिष्माचा करिष्मा पाहण्यासाठी नगरकरांनी तोबा गर्दी केली. प्रेरणा मंडळाची दहीहंडी फुटल्यानंतर ‘आय लव्ह यू’ नगरकर या शब्दात करिष्मा कपूरने नगरकरांच्या प्रतिसादाला दाद दिली.

दरम्यान, शहरातील विविध भागात असणार्‍या राधाकृष्ण मंदिरात रविवारीमध्ये रात्री अनेक ठिकाणी श्रीकृष्ण जन्मअष्टमी साजरी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी दहीकाळाचा उत्साव साजरा झाला. शहरातील दिल्लीगेट, चौपांटी करांजा, चितळे रोड, आडते बाजार, दाळ मंडई, कापडबाजार, जुने बसस्थानक, झोपडी कन्टीन, प्रोफेसर कॉलीनी, गवळीवाडा, ब्राम्हण गल्ली, गोविंदपूरा परिसरातील अनेक दहीहंडी मंडळानी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांनी या उत्सवाच्या माध्यमातून उमेदवारीसाठी फिल्डींग लावण्याचा प्रयत्न केला. शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार पोलिस ठाण्यात अनेकांना दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी परवागी देण्यात आली होती. मात्र या उत्सवासाठी स्टेज उभारणीसाठी परवानी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासानाने या मंडळाचे स्टेज हटविले होते.

सोमवारी रात्री आठ सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण सुप्रसिध्द हिंदी तारका करिष्मा कपूर होती. साधारण आठच्या सुमारास करिष्मा या ठिकाणी दाखल झाली. करिष्माचा करिष्मा पाहण्यासाठी हजारो तरूणांनी या ठिकाणी तोबा गर्दी केली होती. यावेळी व्यासपिठावर आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप आणि आ. शिवाजी कर्डिले उपस्थित होते. पावणे नऊच्या सुमारास मुंबईच्या गोविंदा पथकाने पाच थराची दहिहंडी फोडली.

या गोविंदा पथकला आ. जगताप आणि आ. कर्डिले यांच्या हस्ते 1 लाख 11 हजार 101 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्यानंतर करिष्मा कपूरने नगरकरांशी संवाद साधतांना आ. संग्राम जगताप आणि आ. अरूण जगताप यांच्यामुळे मला नगरला येण्याची संधी मिळाली. दहिहंडी उत्सावानिमित्त नगरकरांना शुभेच्छ देत करिष्मा कपूरने आय लव्ह यू नगरकर असे म्हणतात नगरकरांनी भरभरून तिला प्रतिसाद दिला. त्यावर करिष्माने यापुढेही मला नगरला यायला आवडेल असे स्पष्ट केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!