Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

अहमदनगर : मतदान केंद्रापासून 200 फुटावर राजकीय पक्षांचा मंडप

Share

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे आदेश :
100 मीटरच्या आत मोबाईल बंदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी टाकण्यात येणारा मंडप मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या बाहेर असणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. नगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश काढले आहेत.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, मतदानाच्या दिवशी लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळवण्यासाठी प्रचार करता येणार नाही. कोणत्याही मतदाराकडे मताची अभियाचना करता येणार नाही. कोणत्याही विशिष्ट उमेदवारास मत न देण्याबद्दल कोणत्याही मतदाराचे मन वळवता येणार येणार नाही.

निवडणुकीशी संबंधित अशी (शासकीय सूचने व्यतिरिक्त अन्य) कोणतीही सूचना किंवा खूण प्रदर्शित करता येणार नाही. मतदान केंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशाद्वाराजवळ किंवा आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक व खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरता किंवा वाजवता येणार नाही. मतदान केंद्रामध्ये किंवा प्रवेशद्वाराजवळ किंवा त्याच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये आरडाओरड करणे किंवा बेशिस्तपणे वागता येणार नाही.

प्रतिबंधीत क्षेत्रापेक्षा अधिक अंतरावरून ध्वनीक्षेपकाचा वापर केला जात असेल तरीही त्यामुळे मतदानासाठी मतदान केंद्रात येणार्‍या व्यक्तीला त्रास होत असेल किंवा मतदान केंद्रामध्ये कामावर असलेल्या अधिकार्‍यांच्या आणि इतर व्यक्तींच्या कामात अडथळा येत असेल तर तो सुध्दा अपराध समजण्यात येईल. मतदारांना ने आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहनाचा वापर करता येणार नाही.

मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या लावण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आत निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी वगळता इतरांना सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन नेण्यास परवानगी नाही. जाहीर प्रचार संपल्यानंतर 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमा होणे, एकत्र संचार करता येणार नाही.

खासगी वाहनांना बंदी ! –
मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिज्येच्या परिसरात निवडणुकीसाठी कामानिमित्ताने शासकीय वाहन वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वाहन आणता येणार नाही. अत्यावश्यक सेवांकरिता लागणारी वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक, पाण्याचे टँकर, दुग्ध वाहतूक करणारी वाहने, विद्युत सेवेकरिता अत्यावश्यक वाहने निवडणूक कामाकरिता नेमण्यात आलेली पोलीस व इतर शासकीय अधिकारी यांची वाहने यांना हा आदेश लागू होणार नाही.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!