Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: निलक्रांती चौकात हाणामारी, गुन्हा दाखल

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – निलक्रांतील हरिजन वस्तीत महिलेसह चौघींना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित आल्हाट, राकेश भोगवाल,दत्तू साळवे, सीमा आल्हाट, शोभा आल्हाट, दीपक भोगवाल (सर्व रा. निलक्रांती चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भावना रुपेश गायकवाड (रा. हरिजन वस्ती,निलक्रांती चौक) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनीच पोलिसांत तक्रार दिली आहे. काल सोमवारी दुपारी गायकवाड व साळवे, आल्हाट यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून सायंकाळी गायकवाड यांच्या घरात बळजबरीने शिरून त्यांच्यासह बहिण, आज्जीसासू आणि मुलीस मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!