Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

Video : सोनई पाणीपुरवठा योजनेसाठी आंदोलक चढले जीवन प्राधिकरणाच्या इमारतीवर

Share

नगर | प्रतिनिधी

सोनई पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या इमारतीवर चढून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. योजना सुरु न झाल्याने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करू असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

अधिक माहिती अशी की, सोनई करजगावसह अठरा गाव पाणी योजना तातडीने सुरू करावी व ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावेत.

तसेच पाणी योजनेची कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालीसुमारे पाचशे ग्रामस्थांच्या उपस्थितीत नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले आहे.

या सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जुलै 2019 पासून बंद केलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गडाख यांच्या समवेत अठरा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्ता रोको आंदोलनदेखील केले होते.

यानंतर येथील जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले होते. परंतु यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ नगर येथे उपोषणाला बसलेले आहेत. यातील काही कार्यकर्ते थेट जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या इमारतीवर चढून गेले आहेत.  मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाहीत. तसेच इमारतीवर चढलेल्या आंदोलकांनी थेट आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!