Type to search

राठोडांसह चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

Featured राजकीय सार्वमत

राठोडांसह चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील बूट फेक प्रकरणात शिवसेनेचे उपनेते अऩिल राठोड यांच्यासह नगरसेविका कमल सप्रे व रिटा भाकरे आणि माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे राठोड यांच्यासह या चौघांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बोल्हेगाव येथील एका रस्त्याच्या प्रकरणात शिवसेनेतर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या देण्यात आला होता. यावेळी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, शिवसेनेचे कार्यकर्ते मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट फेकला होता. या प्रकारावरून महापालिकेचे कामकाज तीन दिवस ठप्प होते. हा प्रकार घडला त्यावेळी राठोड तेथे उपस्थित होते.

यावेळी काढण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये राठोड अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत वक्तव्य करत असल्याचे आले आहे.या प्रकाराबद्दल सोनटक्के यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात व्यत्यय आणणे, शिविगाळ करणे, अंगावर धाऊन येणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातून अटक टाळण्यासाठी राठोड, सप्रे, भाकरे आदींनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे या सर्वांना केंव्हाही अटक होऊ शकते. पोलीस काय कारवाई करतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!