Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

यंदा ज्वारीच्या दाण्याला मोत्याचे मोल!

Share

उत्पादन घटल्याचा परिणाम : बाजरीच्या दरातही वाढ

राहुरी (प्रतिनिधी) – यंदा सर्वत्र पावसाअभावी दुष्काळाचे सावट जाणवत असतानाच रब्बी हंगामही यावर्षी सपशेल फेल गेला आहे. मागील वर्षीही खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेल्याने यावर्षी अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार असल्याचे संकेत धान्य बाजारातील व्यापार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे ज्वारीच्या दाण्याला मोत्याचे मोल आले असून बाजरीचे दरही वाढल्याने सामान्यांची भाकरी आता महागणार असल्याची चिन्हे आहेत. 

मागील वर्षी ज्वारी आणि बाजरीच्या पेरणीखालील क्षेत्रात घट झाली. पर्यायाने उत्त्पादन कमी झाल्यानेे ज्वारी व बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. ज्वारीच्या दाण्याला मोत्याचे मोल आले असून बाजरीही बाजारात गव्हापेक्षाही भाव खाऊ लागली आहे. यावर्षीही राहुरी तालुक्यात ज्वारी आणि बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र 11 हजार 110 हेक्टर क्षेत्रासाठी निर्धारित केले असतानाच केवळ 216 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे ज्वारीच्या भाववाढीचा आलेख चढताच राहणार असल्याचे संकेत आहेत. पर्यायाने गरिबांच्या भाकरीला महागाईची फोडणी बसून ती यंदा महागणार असल्याचे चिन्ह आहेत.

एक महिन्यांपूर्वी ज्वारीचा भाव प्रतिक्विंटल दोन हजार रुपये होता. आता महिनाभरात हाच दर तीन हजार रुपयांवर गेला आहे. तर बाजरी एक हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात होती. आता हाच दर दोन हजार 400 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तयार चांगल्या प्रतीची ज्वारी 2600 रुपये ते तीन हजार रुपये क्विंटलने आहे. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!