नगरच्या इस्तमाला दीड लाख मुस्लिम भाविकांची हजेरी

0

दोन दिवस धार्मिक प्रवचनात भाविक दंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरला दोन दिवसीय जिल्ह्यातील मुस्लिम धर्मियांच्या इस्तमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री या इस्तमाचा समारोप झाला. दोन दिवस चालेल्या या धार्मिक कार्यक्रमात जिल्ह्यातील दीड लाख मुस्लिम भाविकांनी हजेरी लावत इस्लाम धर्माची शिकवण आचरणात आणण्याचा निश्‍चिय केला.
तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसारात शेंडीबायपास जवळ सुमारे 80 ते 85 एकर परिसारात हा धार्मिक कार्यक्रम पारडला. शुक्रवार (दि.17) ला इस्तमाला सुरू झाला. यावेळी मौलाना मंजूर, मौलाना शोएब, मौलाना मुबीन, नगर शहराचे अध्यक्ष (अमीर) अब्दूल सलाम, पप्पूभाई काझी यांनी आलेल्या मुस्लिम बांधवांना इस्लाम धर्माची पवित्र प्रवचन आणि उपदेश दिले.
या इस्तमा कार्यक्रमात दिवस दोन दिवस धार्मिक प्रवचन आणि मोहमद पैगंबर यांनी दिलेली शिकवण कशी आचारणात आणायची, मुस्लिम बांधवांचे जगण्याचे ध्येय काय आहे, इस्लामचा अर्थ काय, समाजाशी कसे वागावेे, लोकांचा आदर कसा कराचा, माणूसकी कशी आचरणात आणायची याबाबचा उपदेश मुस्लिम भाविकांना देण्यात आला.
नगरमध्ये वर्षातून दोन वेळा इस्तमा होत असल्याची माहिती संयोजकांनी दिली. इस्तमाला तरूण ते वयोवृध्द भाविक मोठ्या संख्याने उपस्थित होते. शनिवारी रात्री उशीरा प्रार्थना (दुवा) चा कार्यक्रम होऊन इस्तमाची सांगता झाली. त्यानंतर शिस्तबध्द पध्दतीने मुस्लिम भाविकांच्या वाहनांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली.

संपूर्ण राज्यातील मुस्लिम भाविकांचा इस्तमा 23 ते 25 फेबु्रवारीला औरंगाबाद येथे होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्याने भाविक हजेरी लावणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

*