नगरचा उड्डाणपुल : फेकुगिरीची उड्डाणे!; मुंबईत बैठक न झाल्याने पालकमंत्री-खासदार तोंडघशी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरच्या उड्डाणपुलासंदर्भात मुंबईत बैठक झाली नसल्याचा लेखी खुलासा राष्ट्रीय महामार्ग कार्यासन मंत्रालयाने दिल्याने पालकमंत्री राम शिंदे व खासदार दिलीप गांधी तोंडघशी पडले आहेत. हे दोघेही नेते फेकुगिरीची उड्डाणे करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

2007 पासून नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय चर्चेला आहे. त्यावेळी रस्ता बांधणी करणारा ठेकेदार उड्डाणपुल बांधणार होता. त्यासाठी 18 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. निर्धारीत वेळेत भूसंपादन न झाल्याने उड्डाणपुलाचा खर्च दीडशे कोटीवर पोहचला. ठेकेदाराने तो करण्यास नकार दिल्यानंतर वाद लवादासमोर गेला. तो प्रलंबित असतानाच राज्यात सत्तांतर झाले.

पालकमंत्री राम शिंदे व खासदार दिलीप गांधी यांनी पूल होणारच असे सांगत अनेकदा त्याचे डिझाईन बदलले. केंद्र सरकारच्या निधीतून उड्डाणपुल होणार, निधी मंजूर झाल्याच्या घोषणा दोघांनीही केल्या. मुंबईत बैठक घेत केंद्राने त्यासाठी सव्वातीनशे कोटी रुपये दिल्याचे जाहीर करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटनाचा परस्पर मुर्हूतही काढला गेला. त्याचे वृत्तही माध्यमांना दिले गेले. मात्र मुर्हुत हुकला. निविदा प्रक्रिया न झल्याने अजूनही उड्डाणपुल कागदोपत्रीच आहे.

पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त शाकीर शेख यांनी माहिती अधिकारात मंत्रालयात मागितले. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी बैठकच झाली नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. त्यामुळे मुंबईतील उड्डाणपुलाची बैठक म्हणजे शिंदे-गांधी यांची फेकूगिरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रेयवादासाठी ही फेकूगिरी असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
…………..
विधीमंडळात आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तारांकित प्रश्‍न केल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी असा विषयच विधीमंडळात चर्चेला आला नाही असे सांगत तांबे यांना खोटे ठरविले. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी विधीमंडळातील चर्चेचा पुरावा माध्यमांसमोर सादर केला. आता मुंबईतील बैठकीवरून पालकमंत्रीच तोंडघशी पडले आहेत.

………………
भाजपचे लोक नगरच्या उड्डाणपुलाचा खेळखंडोबा करताहेत. फक्त श्रेयासाठी घाई करून कुठलीही मंजुरची प्रक्रिया अद्याप झालेली नसताना भूमिपूजन व बैठकाचे नाटक कशासाठी?. आमचा नितीन गडकरी यांच्यावर विश्‍वास आहे. त्यांनीच आता या प्रश्‍नात लक्ष घालावे. – सत्यजित तांबे, प्रदेश उपाध्यक्ष, युवक काँग्रेस.

……………

गडकरींनीही सुनावले खडे बोल गडकरींनीही सुनावले खडे बोल  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असे सांगत शिंदे-गांधी यांनी त्याच्या तारखाही जाहीर केल्या. ही बाब समजल्यानंतर नितीन गडकरी यांनी दोघांची कानउघडणी केली. निविदा प्रक्रिया पूर्ण न होताच भूमिपूजनाचा मुर्हुत कसा? यावरून झापाझापी झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 

LEAVE A REPLY

*