Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरकर अनुभवताहेत एकाचवेळी पावसाळा अन् हिवाळा

Share

राज्यात सर्वात कमी तापमान 16.4

अहमदनगर (प्रतिनिधी)- नोव्हेंबर उजाडला तरी नगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची बरसात होत आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नगरमध्ये 16.4 अंश सेल्सिअस झाली आहे.

नगर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला. अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी 162 ट्क्के पाऊस पडला. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले. समुद्रात एका पाठोपाठ चक्रीवादळ निर्माण होत असल्याने त्याचा तडाखा नगर जिल्ह्यालाही बसत आहे. काल संगमनेर, राहुरी, पाथर्डी, नगरच्या सावेडी, नागापूर, विळद आणि पारनेरात मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी सर्वात कमी तापमानाची नोंद नगरमध्ये 16.4 झाली. पहाटे धुकेही पडू लागले आहे. आगामी काळात आणखी थंडी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्ये 19.4, जळगाव 20.2, पुणे 19.3, औरंगाबाद 18.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जिल्ह्यात पाऊस सुरु असतानाच पहाटे थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

संगमनेरात 200 टक्के पाऊस
नगर जिल्ह्यात अकोलेत सर्वाधिक 303 टक्के पाऊस पडला आहे. त्या खालोखाल संगमनेरात 208 टक्के पाऊस पडला. गतवर्षी या तालुक्यात केवळ 452मिमी (108 टक्के) पाऊस पडला होता. यावेळी दुप्पट म्हणजे तब्बल 887 मिमी (208 टक्के) पाऊस पडला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!