Type to search

नगरच्या दुष्काळावर नेत्यांची फुंकर

Featured सार्वमत

नगरच्या दुष्काळावर नेत्यांची फुंकर

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. शेतकरी संकटात असताना सरकारला त्याचं काहीच देणंघेणं नाही. मात्र, तुम्ही धीर सोडू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कर्जत, राशीन आणि जामखेड येथील शेतकर्‍यांना धीर दिला. तर आ. बाळासाहेब थोरातांनीही अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. एवढेच नव्हेतर एखादी आदर्श छावणी चालवून दाखवा असे आव्हानही दिले. तसेच पालकमंत्री राम शिंदे यांनी टंचाईच्या कामात जे कुणी हलगर्जीपणा करीत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. राज्य सरकारकडून दुष्काळ बाधित शेतकर्‍यांसाठी आलेले 400 कोटी रुपयांचे अनुदान 6 लाख 36 हजार 790 शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनाने दिली. नेत्यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!