Type to search

Featured सार्वमत

नगर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share
  • …तर जनतेच्या भावनांचा भडका उडेल : ना. विखे
  • अच्छे दिन हरवले, जनता सरकारला वैतागली : थोरात
  • श्रीरामपुरात ससाणे, आदिक गटांकडून सरकारचा निषेध
  • राहाता, अकोले, कोपरगावात प्रतिसाद
  • नेवाशात तहसीलवर मोर्चा
  • देवळालीत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
  • जामखेडमध्ये मोटारसायकली ढकलत शासनाचा निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या काँग्रेसच्या भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरासह श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहुरी, नेवासा, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, पारनेरसह अन्य ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बंद आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व विरोधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्यायकारक दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. यात नगर जिल्ह्यातील तालुक्यांची गावे व खेड्यापाड्यातील व्यापारी वर्ग, सामान्य जनता सहभागी झाली होती. 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे 110 डॉलर्स प्रती बॅरल होती. तेव्हा मुंबईत पेट्रोलचा दर 80 रुपये तर डिझेलचा दर साधारण 64 रुपये प्रती लीटर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे 80 डॉलर्स प्रती बॅरल म्हणजेच सन 2014 च्या तुलनेत 30 डॉलर्सने कमी आहे. तरीही आज शहरात पेट्रोलचे दर 88.23 रुपये आणि डिझेलचे दर 76.96 रुपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान नगर शहरातील व्यवहार दिवसभर सुरळीत होते. शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यंगताची उपस्थिती नेहमीप्रमाणे होती.विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. शहरात मोहरम व गणेशोत्सवाची पार्श्‍वभुमी तर जनता, व्यापारी बांधव व सार्वजनिक मालमत्तेचे या आंदोलनाने नुकसान होणार नसल्याची दक्षता घेण्यात आली असून, केंद्र सरकारचा निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात आ.संग्राम जगताप, विनायक देशमुख, अण्णासाहेब शेलार, प्रा.माणिक विधाते, दीप चव्हाण, उबेद शेख, संजय झिंजे, अभिषेक कळमकर, संजय सपकाळ, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, गौरव ढोणे, निखील वारे, रॉबीन साळवे, सचिन डफळ, अ‍ॅड.आर.आर. पिल्ले, अशोक गायकवाड, साहेबान जहागीरदार, सोमनाथ धूत, वसीम सय्यद, समीर पठाण, दादा दरेकर, अ‍ॅड.शारदा लगड, किसनराव लोटके, रेखा जरे, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, रजनी ताठे, शारदा वाघमारे आदि सहभागी झाले होते. जामखेडमध्ये विरोधकांनी मोटारसायकली ढकलत शासनाचा निषेध केला. दरम्यान, काँग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले.

दरम्यान, नगरच्या विभागीय एसटी महामंडळाकडे बंद बाबत चौकशी केली असता, अकोले आणि कोपरगाव येथील एसटी महामंडळाच्या बसे दुपारी 3 वाजेपर्यंत बंद होत्या. नगर शहरातील तारकपूर एसटी स्टँडवर सकाळी 11 पर्यंत एसटी बंद होत्या. उर्वरित जिल्ह्यात एसटी बसेस रस्त्यावर धावत होत्या. बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संगमनेर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समविचारी पक्ष व सामाजिक संघटना यांच्यावतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, आबासाहेब थोरात, नवनाथ अरगडे आदींसह कार्यकर्ते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!