Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

पारनेरमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला

Share

पारनेर | प्रतिनिधी

पारनेर शहरातील बंडू मते या युवकावर सकाळी तलवारीने हल्ला झाला. या युवकाचा चहाचा व्यवसाय असुन रोजच्या प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी येत असता ६.३० वाजनाच्या सुमारास आंबेडकर चौकात त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

जखमी बंडू यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविले असुन ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असावी असा संशय व्यक्त होत आहे. शहरातील दोन तरुणांनीच हल्ला केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती दिली आहे.

संशयित हल्लेखोरांच्या शोधासाठी सहा. पोलिस निरीक्षक राजेश गवळी पथकासह रवाना झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!