नगर क्लबच्या सचिवपदी निलकंठ अमरापूरकर

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर क्लब लिमिटेडसाठी गुरूवारी (ता. 30) मतदान झाले आणि रात्री उशीरा निकाला जाहीर झाला आहे. सचिव व संचालक पदासाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत सचिव पदाच्या लढतीमध्ये निलकंठ अमरापूकर यांनी अजय बोरा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर कार्यकारी समितीच्या निवडणुकीत विकी दिलीप मुथा यांचा पराभव झाला असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी रात्री उशीरा केली.

नगर क्लब याची स्थापना सुमारे 1870 मध्ये झालेली आहे. उच्चभू्रचा क्लब म्हणून जिल्ह्यात त्याची ख्याती आहे. सचिव व संचालक मंडळाची दर दोन वर्षाला निवड होते. यावेळी सचिव पदासाठी दोन आणि अकरा संचालकांसाठी बारा जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सचिवपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात तिघांनी माघार घेतली. संचालक पदासाठी 22 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दहा जणांनी माघार घेतली. क्लबचे स्थायी सभासद 1 हजार 447 आहेत. कार्पोरेट सभासद 36 आणि अजीवन सभासद 77 आहेत.

गुरूवारी झालेल्या मतदानात कार्यकारी समितीच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यावेळी 10 हजार 895 मतदान होते. यातील 60 मते अवैध ठरली असून 10 हजार 835 मते वैध होती. या मतदारसंघात विकी मुथा यांचा पराभव झाला आहे. तर सचिवपदासाठी अजय बोरा आणि निलकंठ अमरापूरकर यांच्या सरळ लढत झाली. यात बोरा यांना 437 तर अमरापूरकर यांना 586 मते मिळाली. यात 21 मते अवैध ठरली. निवडणुक निर्णय अधिकारी माळी यांनी अमरापूरकर यांना विजयी घोषित केले.

विजयी उमेदवार – सचिव : नीलकंठ अमरापूर.
संचालक : योगेश मालपाणी, राहुल काथेड, नीलेश चोपडा, हेमेंद्र कासवा, गौरव बोरा, आगेश धुप्पड, ईश्वर बोरा, पवन गांधी, संजय ताथेड, मयूर कोठारी, निखील कराचीवाला.

 

LEAVE A REPLY

*