Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मच गया शोर सारी नगरी में…

Share

शहरातील शाळेमध्ये दहिहंडी फोडून बोलगापाळांनी लुटला आनंद

दादाचौधरी विद्यालयात दहीहंडी उत्सव रंगला

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त शाळेत दहीहंडी चा कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. गोविंदा आला रे आला…या गाण्यावर मुलांनी ताल धरला व नृत्याचा आनंद घेतला …दहीहंडी फोडण्यासाठी शाळेतील 10 वीचे विदयार्थी सहभागी झाले होते.गोविंदानी दहीहंडी फोडतांच मुलांनी जल्लोष केला. हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयात सालाबादप्रमाणे श्री कृष्ण जन्मष्ट्मी उत्साहात साजरी करण्यात आली. तुला पाह तेरे मालिका फेम प्रसिद्ध कलाकार मोहिनीराज गटणे यांच्या हस्ते भगवान श्री कृष्णाचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, मुख्याध्यापक संजय मुदगल, विठ्ठल ढगे, सुभाष येवले, वर्षा कुलकर्णी, दीपक आरडे, अजय महाजन,नितीन केणे, विजय राहिंज, गोवर्धन पांडुळे,प्रशांत शिंदे ,भालचंद्र जगनाडे,मनोज हिरणवाळे,शिवाजी भोंडवे, प्रसाद एडके, आप्पा सकट, सुनंदा देशमुख, वर्षा गुंडू, अमृता धामणगावकर, ज्योती बोलके आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमीचा आनंद लुटला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विद्याद्यार्थ्यांनी सादर केलेले गवळण व कृष्ण जन्माच्या गीताने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. गोविंदाने पथकाने हदीहंडी फोडताच हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की! च्या जयघोषाने शाळेचा परिसर दणाणून निघाला. यावेळी विद्यार्थी एकच जल्लोष केला. गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमा निमित्त शाळेच्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून फुलांची व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. तर शाळेच्या मैदानात हा दहीहंडीचा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुभाष ठुबे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी भजन व गवळण सादर केली. तर कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला…, राधा ही बावरी आदि विविध गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली. सुभाष ठुबे म्हणाले की, दहीहंडी हे एकतेचे प्रतिक आहे. देशात विविधतेने नटलेल्या एकात्म भारताचे दर्शन अशा सण उत्सवातून घडत असते. तर सर्व समाजबांधव एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!