नगरच्या बाजारपेठेत 75 कोटींचे खते, बियाणे पडून

0
जिल्ह्यात 80 हजार हेक्टरवर 22 टक्के पेरण्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- दमदार सुरूवातीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह खते, बियाणे आणि किटकनाशक विक्रेते हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला असून त्या ठिकाणी खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत.
तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण होवून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहे. साधारण आठ दिवसांपासून पावासाने उघडीप दिल्याने नगर जिल्ह्यात 50 कोटींच्या जवळपास रासायनिक खते आणि 25 कोटींच्या जवळपास बियाणे पडून असल्याची माहिती बियाणे आणि खते विक्रेत्यांकडून देण्यात आली.
राज्याच्या नकाशावर नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, अलिकडेच्या काही वर्षात जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र पावण पाच लाख हेक्टर असून दमदार पाऊस झाल्यास त्यात कृषी विभागाकडून वाढ करण्यात येते. यंदा कृषी विभागाने ऊसासह 5 लाख 99 हजार हेक्टर खरीप हंगामासाठी प्रस्तावित केलेले आहे.
जिल्ह्यात साधारण जून महिन्यांच्या सुरूवातपासून पावसाला सुरूवात झाली. मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या काळातील कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. जून महिन्यांत जिल्ह्यात 33 टक्के पाऊस झाला. कृषी विभागाच्या अहवालानूसार जिल्ह्यात 80 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पेरणीची टक्केवारी अवघी 22 टक्के आहे.
अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून अद्याप भाताच्या लागवडीला सुरूवात झालेली नाही. जिल्ह्याच्या दक्षिण भागात मूग, उडीद आणि तूरीची पेरणी झालेली आहे. 8 हजार हेक्टरच्या जवळपास कपाशी लागवड झाली असून पाऊस गायब झाल्याने कपाशीची लागवड रखडली आहे. साधारण जून महिन्यांपर्यंत कपाशी लागवड आणि कडधान्यांची पेरणी होत असते.
30 जूनपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पिक पॅटन बदणार आहे. यामुळे कपाशी लागवडीचे क्षेत्र बाजारीकडे वळणार आहे. यामुळे पुढील आठ दिवस शेतकरी आणि बियाणे व्यापार्‍यांसाठी महत्वाचे असल्याचे विक्रेते अजय मुथा यांनी सांगितले.
नगरच्या बाजार पेठेत साधारण 30 ते 40 टक्के बियाणे पडून असून त्याची अंदाजे किंमत 25 कोटींच्या जवळपास असल्याची माहिती बियाणे विक्रेत्यांनी दिली. तर 20 ते 25 टन खतांचा साठा शिल्लक आहे. त्याची किंमत 50 कोटींच्या जवळपास आहे. बियाणांवर जीएसटीचे संकट नसले तरी रासायनिक खतांना जीएसटी लागू असल्याने पाऊस लांबल्याचा त्याची झळ शेतकर्‍यांच्या खिशाला मात्र बसणार आहे.

………….
पुढील आठ दिवस शेतकरी आणि व्यापार्‍यांसाठी काळजी आहेत. जिल् ह्यता सर्वदूर दमदार पावसाची आवश्यकता आहे. पाऊस लांबल्यास 30 जून पिक पध्दतीबदल होईल. कपाशीचे क्षेत्र घटून त्याची जागा बाजरी आणि अन्य पिके घेतली. याचा फटका बियाणे विक्रीसोबत खत विक्रीवर होणार आहे. बाजरीला केवळ युरिया याची आवश्यकता असून कपाशीला मोठ्या प्रमाण खतांची आवश्यकता आहे. बियाणे आणि खतांची विक्री आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.
पवन गांधी, संचालक, पवन फर्टीलाझरचे, नगर.
……………
जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी पेरण्या सुरू आहेत. अद्याप परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. जिल्ह्यात 80 हजार हेक्टरच्या जवळपास पेरण्या झाल्या असून पेरणीचा आकडा आठवडेभरात वाढणार आहे.
पंडितराव लोणारे, जिल्हाध्यक्ष अधीक्षक कृषी.
…………….

LEAVE A REPLY

*