Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

नगरमध्ये ‘बर्निंग कार’

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)-  पोलीस अधीक्षक चौकात रविवारी रात्री औरंगाबादकडून पुण्याकडे जाणार्‍या एका बीएमडब्ल्यू कारला अचानक आग लागली. या कारमध्ये पुण्याचे डॉक्टर, एक महिला आणि एक व्यक्ती असे तिघेजण होते. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारने पेट घेतल्याचे एका दुचाकीस्वाराच्या लक्षात येताच त्याने दुचाकी कारला आडवी घालत कार थांबवण्याचा इशारा केला व कारने पेट घेतल्याचे सांगितले. त्यानंतर कारमधील तिघे बाहेर पडले. यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. बघता-बघता संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली.

आग ऐवढी भीषण होती की अग्नीशमन विभागाच्या गाडीला बोलवावे लागले आणि आग विझवण्यात आली. यामुळे काही काळ पोलीस अधीक्षक चौकात एकेरी वाहतूक सुरू होती तर घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुचाकीस्वाराच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!