Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सलग पाचव्या दिवशी नगर थंड !

Share

किमान तापमान 14 अंश सेल्सिअस

अहमदनगर (प्रतिनिधी)- तळ ठोकून बसलेल्या पावसाने अखेर नगर जिल्ह्यातून निरोप घेतला असून दबक्या पावलाने थंडीचे आगमन झाले आहे. शनिवार वगळता सलग पाचव्या दिवशी महाबळेश्वरपेक्षा नगरचे तापमान सर्वात थंड नोंदवले गेले. काल रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नगरमध्ये 14.6अंश सेल्सिअस होते. त्यात आणखी घट होत सोमवारी 14 अंश सेल्सिअसपर्यंत आले.

सर्वात थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद 15.6 अंश सेल्सिअस झाली. अन्य शहरांमध्ये नोंदवलेले तापमान असे (अंश सेल्सिअसमध्ये)-जळगाव 18.6, नाशिक 17.5, पुणे 16.8. जिल्ह्यात थंडीचा पारा खाली आल्याने रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटविल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी कान टोपी व स्वेटर असे उबदार कपडे घालून नागरिक बाहेर पडताना दिसत होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!