Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : पत्नीचा खून करून घराजवळ पुरला मृतदेह

Share

नगरजवळील दरेवाडीतील प्रकार । आरोपीला अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) –नगर तालुक्यातील दरेवाडी येथे महिलेचा खून करून मृतदेह घरासमोरच पुरला असल्याची घटना बुधवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली. राजकन्या महादेव आगाशे (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या घराजवळ तीव्र दुर्गंधी सुटल्यामुळेच या खुनाला वाचा फुटली असून या घटनेमुळे दरेवाडी परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मयतच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कुबली दिली आहे.

नांदेड येथून कामानिमित्त आलेले आगाशे कुटुंब चार वर्षांपासून दरेवाडी येथे आझाद चौकात स्थायिक आहे. पती, दोन मुले व सुना असा त्यांचा परिवार असून त्यात राजकन्या यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. रविवार (दि.29) च्या रात्री सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे आगाशे पती-पत्नीत घरगुती भांडण झाले. या भांडणातूनच महादेव संभाजी आगाशे याने पत्नी राजकन्या हिचा दोरीने गळा आवळून खून केला.

त्यानंतर मृतदेह घराजवळ पत्र्याच्या शेड लगत चुली जवळ खड्डा करून अर्धवट अवस्थेत पुरवून ठेवला. हा प्रकार बुधवारी (दि.2) लक्षात आला. आगाशे यांच्या घराजवळ तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी ही माहिती आधी सरपंच अनिल करांडे यांनी दिली. त्यानंतर सरपंच करांडे यांनी भिंगार कॅम्प पोलीसांना कळविले. साहय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील, उपनिरिक्षक गायकवाड, पोलीस कर्मचारी देशमुख, राजू सुद्रिक घटना स्थळी दाखल झाले. दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणची माती उकरली असता राजनंदा यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नाहीत. पोलीसांनी मग राजकन्या यांचा पतीला महादेव याला ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली आहे. महादेव आगाशे याला अटक करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालय येथे करण्यात आली.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!