Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

राधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी

Share

अहमदनगर | प्रतिनिधी 

उद्या रविवारी सकाळी 11 वाजता राज्यातील फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. 17 जूनपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी नव्या मंत्र्यांना समाविष्ट करणे निश्चित मानले जात होते. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होत आहे.

दरम्यान , संभाव्य मंत्रांना शनिवारी सायंकाळी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना अधिकृत निरोप आल्याचे वृत्त होते.

शनिवारी त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे मंत्रिपद ही त्यांच्यासाठी वाढदिवसाची मोठी भेट ठरणार आहे. निरोप मिळाल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. दुपारी 2 च्या सुमारास ते मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यांना कोणते मंत्रालय मिळणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, अन्य संभाव्य नावे सायंकाळपर्यंत समोर येतील, अशी माहिती आहे.

रेसमधील नाव
जयदत्त क्षीरसागर(शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना), अविनाश महातेकर (आरपीआय), राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), संजय कुटे (भाजप), आशिष शेलार (भाजप), अनिल बोंडे (भाजप)

भाजपचे पहिल्यांदाच मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज शनिवारी वाढदिवस असल्याने दिवसभर ते लोणीत सत्कार स्वीकारत होते. सकाळीच त्यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. मंत्रीमंडळ विस्ताराची माहिती मिळताच दुपारनंतर ते मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. भाजप प्रवेश अन् नंतर लगचेच मंत्री पदाची शपथ ही फडणवीस सरकारकडून विखेंना वाढदिवसाचे गिफ्ट असल्याची चर्चा राजकीय वुर्तळात रंगली. काँग्रेस, शिवसेना अन् पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेले विखे पाटील पहिल्यांदाच भाजपचे मंत्री होणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!