Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर जिल्ह्यातील विद्यमान सर्व आमदारांसह विखे, पिचड, पाचपुते यांना भाजपची उमेदवारी

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपने 125 उमेदवारांची पहीलीयादी जाहीर केली आहे.यात नगर जिल्हयातील विद्यमान पाच आमदारांसह विखे, पिचड व पाचपुते यांचा समावेश आहे. त्यामुळे या नेयांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.

जाहीर झालेल्या यादीनुसार शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी – शिवाजी कर्डीले, कर्जत जामखेड – राम शिंदे, कोपरगाव – स्नेहलता कोल्हे,  पाथर्डी शेवगाव – मोनिका राजळे, अकोले – वैभव पिचड,  नेवासा – बाळासाहेब मुरकुटे,  श्रीगोंदा – बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून उमेदवारी बदलाच्या तसेच अन्य पक्षातील नेत्यांच्या संपर्काच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. काही मतदारसंघात भाजपातुन बंडखोरीची शक्यता आहे त्याचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल. उमेदवारी जाहीर होताच नेत्यांच्या सर्मथकांनी आपआपल्या मतदारसंघात जल्लोष केला आहे.

अकोल्यात पिचड विरोधात कोण ?

एकास एक लढत झाल्यास रंगत वाढणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला अकोले मतदारसंघातील प्रत्येक गावातून मताधिक्य मिळवून देणारे राष्ट्रवादीचे विद्यमान आ. वैभव पिचड यांनी विधानसेभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश मिळविला. भाजपच्या पहिल्या यादीत पिचड यांना उमेदवारी जाहीर झाली असून आता त्यांच्या विरोधात आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

गतपंचवार्षिकला वैभव पिचड हे राष्ट्रवादीचे उमदेवार होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून मधूकर तळपाडे यांनी उमेदवारी केली होती. त्यावेळी पिचड यांनी 20 हजार 62 मतांनी तळपाडे यांचा पराभव केला होता. यंदा मात्र, पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर आघाडीच्यावतीने कोण पिचड यांना टक्कर देणार याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. या मतदारसंघात एकास एक टक्कर झाल्यास निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

कर्डिले भाजपच्या पहिल्या यादीत

तिकीट कापण्याची चर्चा ठरली फोल

अहमदनगर (प्रतिनिधी)- सोधा (सोयरे-धायरे) राजकारणासाठी प्रसिध्द असणारे राहुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारीला यंदा अडचण असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पक्षाकडून विद्यमान काही आमदारांचे तिकीट कापण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यात आ. कर्डिले यांच्या समावेश असल्याची चर्चा होती. मात्र, आ. कर्डिले यांनी सर्व चर्चांवर मात करत भाजपच्या पहिल्याच यादीत स्थान पटावत आघाडी घेतली आहे.

गत पंचवार्षिकला शिवसेनेकडून निवडणूक लढविलेल्या उषाताई तनपुरे यांचा कर्डिले यांनी 25 हजार 676 मतांनी पराभव केला होतो. त्यानंतर राहुरी तालुक्याच्या राजकारणात विखे यांच्या प्रवेशानंतर कर्डिले-विखे अशी जोडी तयार झाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत कर्डिले यांचे जावई आ. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीमुळे विखे-कर्डिले यांच्यातील अंतर वाढल्याची चर्चा रंगली होती. मात्र, असे काहीही न घडता कडिले यांनी भाजपकडून उमेदवारी खेचून आणली आहे. राहुरी मतदारसंघ हा शिवसेनेला सुटेल अशी चर्चा मध्रंतरी जोर धरली होता़ त्रातच भाजपचे निष्ठावान सत्यजित कदम रांनीही उमेदवारीसाठी प्ररत्न सुरू केले होते़ परंतु, भाजपने कर्डिले रांनाच पुन्हा संधी दिली आहे. यामुळे आता राहुरीत पुन्हा कर्डिले विरोधात त्यांचे तनपुरे अशी पारंपारिक लढत होणार आहे.

पाचपुतेंच्या हाती पुन्हा कमळ

एकास एक लढत झाल्यास रंगत वाढणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणातील जर-तरच्या सर्व शक्रता मोडीत काढत भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते रांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्रामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आ. राहुल जगताप आणि काँग्रेसच्या विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकारी अनुराधा नागवडे रांची भाजपच्या उमेदवारीला पूर्ण विराम मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत पाचपुते यांनी पक्षाचा उमदेवार निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असतांना भाजपने मोठे मताधिक्क्य मिळविले. त्यानंतर देखील विधानसभेच्या तोंडावर पाचपुते यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही. नागवडे व आ. जगताप हे दोघेही भाजपच्रा संपर्कात असल्राची चर्चा होती. मात्र, भाजपने पाचपुते रांनाच संधी दिली आहे. पाचपुते हे प्रत्रेक निवडणूक वेगळ्रा पक्षाकडून आणि चिन्हावर लढतात असा इतिहास आहे. मात्र, रावेळी ते सलग दुसर्‍रांदा भाजपकडून निवडणूक लढणार आहेत. गत निवडणुकीत त्यांचा 13 हजार 637 मतांनी पराभव झाला होता. यंदा त्यांच्या विरोधात कोण हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बंडाच्या इशार्‍यानंतर मोनिका राजळे यांना उमदेवारी

पक्षाने दाखविला दुसर्‍यांदा विश्‍वास

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपने पुन्हा मोनिका राजळे रांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजळे यांच्या उमेदवारीमुळे कालपरवापर्यंत बंडाचे निशाण फडविणार्‍यांना हा जबर धक्का आहे. यामुळे आता मतदारसंघातील बंडोबा काय भूमिका घेणार, आघाडीच्यावतीने राजळे यांच्या विरोधात कोण उमेदवारी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शेवगाव-पाथर्डीतून गतवेळी मोनिका राजळे रा विजरी झाल्रा होत्या. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांचा 53 हजार 185 मतांनी पराभव केला होता. मात्र, गत पाच राजळे यांच्यावर पक्षातील कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेत नाहीत, असा ठपका ठेवत पक्षाच्यातील एका गटाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यापर्यंत शिष्टमंडळ नेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील राजळे शांतपणे आपले काम सुरू ठेवले होते. मंगळवारी जाहीर झालेल्या पहिल्याच यादीत राजळे रांचे नाव जाहीर झाल्याने राजळे विरोधक आता थंड होणार आहे. त्यांच्या विरोधात आघाडी कोणाला संधी देणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!