Friday, April 26, 2024
Homeनगरनगर अर्बनच्या ठेवी व्याजदारात वाढ

नगर अर्बनच्या ठेवी व्याजदारात वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेने ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासकांनी दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवींवरील व्याजदर ठरविणेबाबत बँकांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यानुसार नगर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवस्थापक समितीने 1 ते 2 वर्षासाठी ठेवीवरील व्याजदरात .25 टक्केने वाढ केली. 1 ते दोन वर्षावरील ठेवींना पूर्वी 8 टक्के दराने व्याजदर दिला जायचा तो आता 8.25 टक्के करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुधारित व्याजदराची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून पासून नव्याने येणार्‍या व नूतनीकरण होणार्‍या ठेवींसाठी करण्यास सुरूवात झाली आहे. शतकोत्तर गौरवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या सन्माननीय ठेवीदार व सभासदांनी उदंड प्रतिसाद देत बँकेवरील विश्वास वृद्धिंगत केलेला आहे. बँकेच्या दैनंदिन ठेवींमध्ये भरघोस वाढ होत आहे. आपल्या बँकेचे ठेवींवरील व्याजदर इतर बँकांच्या तुलनेने आकर्षक व अधिक फायद्याचे असून सर्व सन्माननीय ठेवीदार व सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक समितीने केले आहे .

सुधारीत व्याजदर
15 ते 90 दिवसांसाठी व्याजदर 4.25%
91 ते 180 दिवसांसाठी व्याजदर 5.00%
181 ते 364 दिवसांसाठी व्याजदर 8.00%
1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत व्याजदर 8.25%
2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत व्याजदर 7.75%
टॅक्स सेव्हिंग स्कीम – मुदत 5 वर्ष
(सर्वांसाठी एकच दर) व्याजदर 7.75%
जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक संघटना,
दिव्यांग व माजी सैनिकांना व्याजदर 0.50% अधिक
15 लाख व त्यापुढील रकमेस 0.25% अधिक

- Advertisment -

ताज्या बातम्या