नाशकात ‘नच ले महाराष्ट्र २०१७’

0

स्कूल स्पोर्ट्स एन्ड कल्चरल एक्टिविटीज असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली महाराष्ट्रातील एकमेव उत्कृष्ट राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा (सत्र २) ‘नच ले महाराष्ट्र-२०१७’  नाशिक येथील विश्वास लान्स येथे नुकतीच पार पडली.

यात महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील नृत्य संघांचा समावेश होता. या नृत्यस्पर्धेत १५० मुलांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धा एकेरी, दुहेरी व ग्रुप नृत्य १०, १४, १७, १९ वयोगटाप्रमाणे घेण्यात आली होती.

या स्पर्धेत नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शाळेच्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या वयोगटात प्रत्येक नृत्य प्रकारात  सर्वाधिक पदके मिळवले. तसेच या स्पर्धेतून विजेतेपद मिळवले स्पर्धक राष्ट्रीय स्तरावर होणारी ३ री राष्ट्रीय नृत्य स्पर्धा नच ले इंडीया या स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र नृत्य संघात निवड करण्यात आली आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश संचालक निलेश राणे यांनी दिली

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर तसेच प्रदेश संचालक निलेश राणे, राज्य सचिव प्रज्ञा भोसले, सहसचिव समीर तोरस्कर आणि मराठी मलिका अभिनेत्री पूनम पाटील व नृत्य विशारद गीतांजली घोरपडे, प्रेरणा राणे, अमोल मोरे उपस्थित होते.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन पूजा सोनार यांनी केले.

LEAVE A REPLY

*