सोडून गेलेल्यांना जशास तसे उत्तर

0

ना. विखे यांचा इशारा : श्रीरामपुरात समर्थकांची बैठक, पदाधिकार्‍यांच्या भेटी

श्रीरामपूर (प्रतिनिधी): आमदार कांबळे यांनी विश्‍वासघात केला. ते कोणत्या आमिषाला बळी पडले, काही कळत नाही, पण भविष्यकाळात जे माझ्याबरोबर राहिलेत ते माझे व जे मला सोडून गेले त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. प्रवरा हाऊसिंग सोसायटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येत्या तीन-चार दिवसांत मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि. प. सदस्य शरद नवले, नगरसेवक राजेश अलघ, बाळासाहेब गांगड, किरण लुणिया, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, संगीता गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य मोरे, कानडे, गिरीधर आसने, रामभाऊ लिप्टे, भाऊसाहेब बांद्रे, गणेश मुदगुले, विराज भोसले, मिस्टर शेलार, भाऊ लवंडे, लक्ष्मण भवार, विष्णुपंत खंडागळे, सरपंच निवृत्ती बडाख, दत्तू पवार, बाळासाहेब दौंड, संदीप शेलार, शंतनू फोपसे, बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण आहेर, सर्जेराव आदिक, रवींद्र गुलाटी, नितीन भागडे, अशोक बागुल, अण्णासाहेब बडाख, अनिल थोरात, अमोल कासार, संचित गिरमे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांनी नामदार विखे पाटील यांच्या रूपाने आम्हाला पितृतुल्य नेतृत्व मिळाले आहे, असे सांगितले. दरम्यान ना. विखे यांनी दुपारी 1.30 वाजण्याच्य सुमारस भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब आवटी यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. अर्धा तासाच्या चर्चेनंतर ते सभापती दीपक पटारे यांच्या बेलापूर रस्त्यावरील संपर्क कार्यालयात दाखल झाले. याठिकाणी त्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख सचचिन बडदे यांच्याशी चर्चा करून श्रीरामपुरातील वातावरणाची माहिती जाणून घेतली.

वाकचौरेंना बसवा!
श्रीरामपूर भेटीत ना. विखे यांना कार्यकर्त्यांनी भाजप-सेना युतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याचे सांगून या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूक लढविली तर त्याचा फटका युतीच्या उमेदवारास बसेल असे सांगून एक तर वाकचौरे यांना शांत बसवा अथवा उमेदवार बदला अशी मागणी केली. मात्र शिवसेना वाकचौरे यांना उमेदवारी द्यायला तयार नाही त्यामुळे योगेश घोलप यांचे नाव चर्चेत आले. तर ना. विखे यांनी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यांशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले.

तरच माघार…
काल सायंकाळी वाकचौरे यांनी ना. विखे यांची भेट घेतली. ना. विखे यांनी वाकचौरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेदवार बदलला तरच मी माघार घेईल. अन्यथा निवडणूक लढविणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*