Friday, April 26, 2024
Homeनगरमहाविकासआघाडीच्या कर्जमाफी योजनेत विसंगती – ना. विखे

महाविकासआघाडीच्या कर्जमाफी योजनेत विसंगती – ना. विखे

शिर्डी (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफीची केलेली घोषणा ही विसंगती निर्माण करणारी असून, सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. सरसकट कर्जमाफी करावी या शेतकर्‍यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला असल्याची टीका करतानाच, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेचाही मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर विसर पडल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी यामध्ये अजून कोणतीही स्पष्टता नाही. शेतकर्यानी मध्यम व दिर्घ मुदतीचे कर्ज घेतलेले आहेत यामुळे निर्णयाचा लाभ सर्वच शेतकर्‍यांना होईल आशी परीस्थीती नाही. अवकाळी पावसाने शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी स्वतःच दिले होते.

- Advertisement -

या आश्वासनाची पूर्तता त्यांनी अधिवेशनात केली नाहीच. उलट 30 सप्टेबर 2019 पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले असले तरी, या हंगामा करिता शेती कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांना सरकारच्या निर्णयाचा कोणताही लाभ होणार नसल्याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की, ऑक्टोबर महीन्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नूकसान झाले.या नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत जाहीर करा ही मागणी अधिवेशनात सातत्याने आम्ही केली पण ही मागणी सरकार पूर्ण करू शकले नाही यामुळे शेतकर्‍यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या