Type to search

Featured सार्वमत

ना. विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी

Share

मराठवाड्याला मिळत असलेल्या पाण्याला अडचण निर्माण झाल्याचा आरोप

औरंगाबाद – नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यावरून काल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना शेतकर्‍यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी त्यांचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेसचे नेते काल जालन्यातून औरंगाबादमध्ये येत असताना शेतकर्‍यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. शेतकर्‍यांनी विखे पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना बराच काळ रोखून धरले. पोलिसांनी आणि नेत्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मार्ग मोकळा केल्यानंतर काँग्रेसचे नेते पुढे निघाले.

समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने नऊ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय दिला होता. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली होती. मात्र धरणातून पाणी सोडू नये म्हणून विखे-पाटील कोर्टात गेल्याने मराठवाड्याला मिळत असलेल्या पाण्याला अडचण निर्माण झाली असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला, या आंदेलनाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी आमदार कल्याण काळे यांच्या घरासमोर हा ताफा अडवला. यावेळी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यास नगर-नाशिकच्या नेत्यांचा विरोध होत आहे, तसेच पाणी न सोडण्यास अधिकार्‍यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभुमीवर हा निषेध नोंदविण्यात आला. मराठवाड्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना पाणी सोडण्यावरून दोन्ही बाजुंनी न्यायालयात याचिकाही दाखल आहेत. येणार्‍या काळामध्ये हा प्रश्न रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!