म्हैसूरच्या राजघराण्याला वारस मिळाला!

0

म्हैसूरच्या राजघराण्याला 400 वर्षांनी एका कथित शापातून मुक्ती मिळाली. येथील वाडियार राजघराण्यात चार शतकांनी पहिल्यांदा एक मुलगा म्हणजे राजवंशाचा वारस जन्मला आहे.

म्हैसूरचे सध्याचे राजे यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांची पत्नी त्रिशिका कुमारी यांनी बुधवारी रात्री सुमारे 9.30 वाजता एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळ व माता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. या बातमीमुळे राजघराण्यात मात्र आनंदाचे वातावरण आहे. यदुवीर आणि त्रिशिकाचे लग्न गेल्या वर्षी जूनमध्ये झाले होते. म्हैसूरच्या राजघराण्याकडे अंदाजानुसार 10 हजार कोटींची संपत्ती आहे.

म्हैसूरच्या गादीवर बसणाऱ्या वाडियार घराण्याच्या राजांना निःसंतान असल्याचे सांगितले जाते. या राजघराण्याला आणि त्यांच्या वारशांना घटनात्मक किंवा कायदेशीर महत्त्व नाही. मात्र कर्नाटकातील बहुतांश लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात.

मात्र वाडियार घराण्याचा निर्वंश होईल, असा शाप श्रीरंगपट्टणचा सरदार श्रीरंगराय याची पत्नी अलामेलम्मा हिने या घराण्याला दिला आहे अशी मान्यता आहे. हा शाप 1610 साली देण्यात आला होता आणि तेव्हापासून खरोखर वाडियार घराण्यात एकाआड एका पिढीमध्ये राजाला अपत्य झालेले नव्हते.

LEAVE A REPLY

*