नाशिक : मायलॅन कंपनीकडून ५० लाखांची मदत; धनादेश जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द

नाशिक : मायलॅन कंपनीकडून ५० लाखांची मदत; धनादेश जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.

मायलेन कंपनीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केल्याबद्दल मायलँन कंपनीचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आभार मानले. तसेच जिल्ह्यातील दानशूर नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी श्री. मांढरे यांनी केले.

मायलंन कंपनीचे उपाध्यक्ष जितेंद्र खेरे म्हणाले, आमचे प्रमुख प्रमोदकुमार सिंग यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला एवढी मदत जमा करणे शक्य झाले आहे. गेली अनेक वर्ष आमची कंपनी नाशिकमधे काम करीत आहे. म्हणून नाशिक निल्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी या संकटावार मात करण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा. या भावनेने आमच्या कंपनीच्यावतीने आम्ही ५० लाखांची मदत जिल्हाधिका-यांना सुपूर्द केली आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, नितीन गावंडे, मापलंन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक भगवान जाधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com