मविप्र मतमोजणी : एक हजार मतांच्या एकूण ९ फेऱ्या होणार

0
नाशिक | गठ्ठे तयार केल्यानंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सायंकाळी चारच्या सुमारास सुरुवात झाली.

एकूण नऊ फेऱ्या होणार असून प्रत्येक फेरीत एक हजार मते मोजली जाणार असल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

निकालाची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली असून सोशल मिडीयावर अफवांचे पिक चांगलेच जोमाने पसरले आहे. अनेकांनी तर निकालाआधीच दोन्ही पनलचा निकाल लाऊन दिला होता.

मात्र असे काहीही नसून आताच मतमोजणीला प्रारंभ झाला असून लवकरच निकाल हाती येणार आहेत. सोशल मीडियातून मतमोजणीचे फोटो, व्हिडीओ अनेक ग्रुपमधून फिरत आहेत.

मविप्र मतमोजणी : ९ फेऱ्या होणार; प्रत्येक फेरीत एक हजार मते मोजली जाणारhttps://t.co/DLu6VmxsDM #Nashik #Nasik #MVP #Results pic.twitter.com/E2ctZzf5BW

— Deshdoot (@deshdoot) August 14, 2017

LEAVE A REPLY

*