मविप्र निवडणूक : नीलिमा पवार यांचा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल

0

नाशिक | मविप्र संस्थेच्या विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आज शेवटच्या दिवस अर्ज दाखल केला. त्यानंतर चोपडा लॉन्स येथे समर्थकांचा मेळावा सुरु आहे.

यावेळी निवडणुकीची रणनीती ठरवली जाते आहे. मेळाव्यास आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, विनायक दादा पाटिल, अरविन्द कारे, मानिकराव बोरस्ते, शोभा बछाव, सुनील ढिकले, डॉ तुषार शेवाळे, शांताराम आहेर, रविन्द्र देवरे, अम्बादास बनकर आदींची उपस्थिती आहे.

यावेळी विद्यमान सरचिटनिस नीलिमा पवार यांनी सांगितले की, संस्थेची निवडणूक ही जागा राजकारणाची नाही. गेल्या वेळी झालेली चूक यावेळी करू नका असे नीलिमा पवार यांनी सांगत संस्थेचा गेला पाच वर्षांचा अहवाल आज सादर करत संस्थेचे झालेली प्रगती सांगितली.

त्या पुढे म्हणाल्या, संस्थेच्या 55 कोटि 88 लाख पाँच वर्षात ठेवी वाढल्या आहेत. आज संस्था कर्जमुक्त आहे. 182 एकर जमिनीची खरेदी केलेली आहे. आपन एक बाई निवडून दिली जशी घरात स्त्री सर्व नियोजन करत असते तस संस्थेच्या बाबतीत मी काळजी घेतली आहे. 126 कोटी चे बांधकाम पाच वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

जागतिक शिक्षणासह राज्य देश संस्था यांचा इतिहास आपण दाखवणार आहोत. आरोग्य विमा विद्यार्थी आणि सभासद यांसाठी आहे. सभासद आणि त्यांच्या पत्नीसाठी मोफत आहे.

1979 रोजी मी सभासद झाले अणि पाहिले मतदान 1984 साली केले.   समाजाला दिलेला शब्द मी बदलनारी नाही. मी कोल्हेंची मुलगी, वसंतरावांची पत्नी प्रणवची आई आहे याचा मला अभिमान वाटतो. सरस्वतीच्या मंदिरात मी कम करते यात कुठेही चुकीचे काम होत नसते.

यावेळी नीलिमा पवार यांनी टिकांना उत्तरे देत विरोधकांचा पापांचा घड़ा भरला आहे. अस आता वाटतंय, विरोधक म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचच भात आहे, असे सांगत नीलिमा पवार विरोधकांवर बरसल्या.

मेळाव्याचे प्रास्तविक शिरीष कोतवाल यांनी केले. तर सूत्रसंचालन किशोर कदम, जयंत पाटिल यांनी केले. यावेळी आमदार अनिल कदम, दिलीप बनकर, माणिकराव बोरस्ते, शेकाप नेते रामचन्द्र बापू पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.

मविप्र निवडणुकीत दाखल झालेले एकूण अर्ज

अध्यक्ष 11, सभापती : 16, उपसभापती : 21, सरचिटणीस 15
चिटणीस 18
इगतपुरी सदस्य : 11
कळवण व सुरगाणा : 13
चांदवड : 7
दिंडोरी व पेठ : 6
नाशिक शहर : 4
निफाड : 31
नांदगाव : 11
सटाणा : 22
मालेगाव : 2
येवला : 19
सिन्नर 23
देवळा : 8
नाशिक ग्रामीण : 15
सेवक प्राथ. व माध्य. : 12
सेवक महाविद्यालयीन : 5
सर्व पदासाठी मिळून आतापर्यंत 270 अर्ज दाखल झाले आहे.

 

LEAVE A REPLY

*