मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलचे उमेदवार जाहीर; प्रगतीचे 6 तर समाज विकासचे 3 विद्यमान रिंगणात

0
नाशिक । मराठा विद्या शिक्षण प्रसारक समाज संस्थेची निवडणूकीला आता खर्‍या अर्थाने रंगत आली आहे. गुरुवारी माघारीनंतर दोन्ही पॅनलनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले.

यात प्रगती पॅनलकडून 6 तर समाजविकास पॅनलकडून 3 विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारी निश्चित होताच प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे.

वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप आणि इच्छिूकांची मोठी संख्या यामुळे मविप्रची यंदाची निवडणूक सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे. गुरुवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने निवडूकीचे चित्र जाहीर झाले आहे. दरम्यान प्रगती पॅनलने आपल्या सहा विद्यमान पदाधिकारी व संचालकांना पुन्हा संधी दिली असून 6 नवीन उमेदवार दिले आहे.

प्रगतीच्या विद्यमानांपैकी चांदवडचे संचालक शिरीष कोतवाल, कळवण संचालक रवींद्र देवरे, सटाणा संचालक भरत कापडणीस, सिन्नर संचालक कृष्णा भगत, येवला संचालक आंबादास बनकर, नाशिकचे संचालक मुरलीधर पाटील, उपसभापती नानाजी दळवी यांना उमेदवारी नाकारली आहे.

तर त्यांच्या जागी इतर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे समाजविकास पॅनलचे विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, निफाडचे संचालक दिलीप मोरे यांना पुन्हा संधी दिली आहे.

नाराजीचा सुर : कमीत कमी उमेदवार नाराज व्हावेत यासाठी दोन्ही पॅनलने माघारीची मुदत संपत आल्यानंतर आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळे अनेक इच्छूकांच्या पदरी नाराजी पडली आहे. यातील काहींनी नाराजी उघड-उघड जाहीर केली नसली तरी त्यांची समजूत काढणे दोन्ही पॅलनपुढील मोठे आव्हान आहे. यातील बरेचजण अंतर्गत विरोध करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेत: प्रगती पॅनलने उमेदवारी नाकारलेले 6 विद्यमान संचालक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘प्रगती’ने डावलेले विद्यमान : प्रगती पॅनलने चांदवड संचालक शिरीष कोतवाल, कळवण संचालक रवींद्र देवरे, सटाणा संचालक भरत कापडणीस, सिन्नर संचालक कृष्णा भगत, येवला संचालक आंबादास बनकर, नाशिकचे संचालक मुरलीधर पाटील, उपसभापती नानाजी दळवी यांना उमेदवारी नाकारली आहे.

यांना मिळाली संधी : प्रगती पॅनलकडून माणिकराव बोरस्ते, राघो आहिरे, उत्तम भालेराव, डॉ. जयंत पवार, सचिन पिंगळे, डॉ. प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, हेमंत वाजे, प्रल्हाद गडाख, रायभान काळे, अशोक पवार यांना संधी देण्यात आली आहे.

समाजविकासचे तिन्ही विद्यमान रिंगणात : प्रगती पॅनलने आपल्या काही विद्यमान संचालकांना डावलून इतर उमेदवरांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे समाजविकासचे विद्यरमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, दिलीप मोरे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहे. तर काही नवीन उमेदरांना संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*