ईथेे ओशाळला मृत्यू; वाचा आणि विचार करा

0

नवीन नाशिक (दिलीप कोठावदे): वर शुक्रवार. वेळ दुपारी १२.२० वाजेची. मानवसेवा केअर सेंटर या वृद्धाश्रमातील अंथरुणावर खिळलेल्या निराधार व वयोवृद्ध इंदूबाई दत्तात्रेय दवटे, (रा.सप्तशृंग गड, नांदुरी, ता.कळवण) या आजींचे निधन झाले.

गेली दोन वर्षे आजी पाथर्डी फाटा येथील मानवसेवा केअर सेंटर मध्ये राहत होत्या. या काळात आश्रम आणि त्याचे संचालक हेच आजींचे परिवार सदस्य बनले होते. स्वतःच्या पोटच्या गोळ्यांनी आजीच्या म्हातारपणाची जबाबदारी झिडकारल्याने आधीच अर्धमेल्या झालेल्या आजींना वृद्धापकाळाने आणि आजारपणाने अधिकच जराजर्जर केले होते.

अखेर मृत्यूनेच त्यांच्यावर दया दाखविली…आणि आजी आश्रमातील दोन वर्षांच्या सहवासाच्या आठवणी मागे ठेऊन निघून गेल्या….!!

मात्र तरीही आजींच्या दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नाही. आश्रमाचे संचालक तुकाराम नवसागर हे त्या दिवशी बाहेरगावी होते. संचालिका ललिता नवसागर यांनी आजींच्या अंत्यसंस्कारांची तयारी केली. सगळी जमवा जमव झाली. मात्र तिरडी बांधायला आणि आजींना उचलायला चार खांदेकरी व्हायला कुणीच तयार होईना.

अनेकांना विनविले…
कित्येकांना फोन केले…
कुणीच नाही आले…!!!

अखेर ललिता नवसागर यांनीच हिंमत केली आणि स्वतःच्या हाताने लहान मुलीच्या सहकार्याने निष्प्राण आजींचे कलेवर तिरडीवर बांधले…!!

तिरडी तर कशी-बशी बांधली…
उचलायचे कसे…?
तेवढयात त्यांचा मुलगा व पुतण्या बाहेरून आले..
एक १२ वर्षांचा तेजस तर दुसरा १३ वर्षांचा निशांत…
त्या लहानग्यांनी आपल्या आजीला खांदा दिला…
आणखी दोघांच्या मदतीने आजींचे शव…

शववाहिकेपर्यंत नेले…
आणि अमरधामात आजींना हिंदू रीती-रिवाजानुसार अंतिम निरोप देण्यात आला…!!!

या घटनेतून माणूस माणसापासून दुरावत चालल्याचे विदारक चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
जन्मदात्रीला तिच्या अखेरच्या काळात आधारआश्रमात सोडून देणाऱ्या मुलांची माणुसकी.
मेलेल्या आजीला उचलायला, तिचे खांदेकरी व्हायला नाकारणाऱ्या माणसांची माणुसकी,
कुठे हरवली तर नाही ना…?
हा प्रश्न अधिक ठळक होऊ लागलाय….!!!

LEAVE A REPLY

*