जीएसटीमुळे दर कमी : संगीतप्रेमींमध्ये आनंद; हॉर्मोनियम, विदेशी वाद्य विक्रीला नवा सुर

0
नाशिक । जीएसटीमुळे अनेक वस्तूंच्या किमंतीत मोठे बदल झाले असले तरी शास्त्रीय मैफिलीसाठी साथ संगत करणार्‍या हॉर्मोनियम वाद्यांच्या किमंतीत घट झाली आहेे. याशिवाय इंर्पोटेड वाद्यांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे अशा वाद्यांच्या विक्रीतही वाढ होत आहे.

संगीत वाद्य खरेदी ही सर्वसामान्यासाठी अत्यावश्यक बाब नसली तरी संगीतप्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. गायन, वादन आणि नर्तन यांच्या सुरेख संगमाला संगीत म्हटले जाते. नाशिकला अशाच संगीताचा वारसा आहे. पुणे आणि डोंबिवली नंतर नाशिक शहराचा सांस्कृतिक नगरी म्हणून उल्लेख होतो.

साहजिकच येथे कलाकारांची संख्या अधिक आहेच शिवाय त्या संबंधित कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर होते असतात. आद्य संगीतकार पं. पलुस्कर हे देखील नाशिक नगरीचे. त्यामुळे येथे संगीतप्रेमींचा मोठा वारसा आहे. जीएसटीमुळे वाद्यांच्या किमंतीत झालेली घट संगीतप्रेमींसाठी आनंददायी बाब ठरली आहे.

हॉर्मोनियम, तबला सितार, वीणा अशा वाद्यांच्या खरेदीला विशिष्ट असा हंंगाम नसतो. वर्षभर त्यांची विक्री होत असते. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर हॉर्मोनियमच्या किंमतीत 10 ते 15 टक्कयांनी घट झाली. पूर्वी या वाद्यावर कर होता.

तो जीएसटीनंतर काढल्यानंतर आता 4 हजारांपासून दर्जेदार हॉमोर्नियम संगीतप्रेमींना मिळत आहेत. विदेशी धाटणीच्या पाश्चिमात्त वाद्यांच्या किमंतीतही नव्या कर प्रणालीमुळे बदल झाला असून अ‍ॅक्वास्टिक गिटार, इमो यांच्या किमंती 8 ते 10 टक्क्यांची घट झाली आहे. तानपुरा, तबला, सारंगी, पखवाज, डफ, सतार, वीणा, व्हॉयलिन मेंडोलिन, युकोलिनी, झायलोफोन, काँगोे, बॉगो, बँजो, बासरी, डफ यांच्या किमंती स्थिर आहेत.

गणेशोत्सव, नवरात्र आणि तुळशी विवाहानंतरचा काळ ढोल, नगारे यासाठी खरेदीचा काळ मानला जातो. या वर्षी त्यामध्ये वाढ दिसून आली. जीएसटीनंतर हॉर्मोनियमच्या किंमती उतरल्याने ग्राहकी चांगली झाली असे केतन छत्रिशाह यांनी सांगितले.

पेटी, इंर्पोटेड वाद्यांना मागणी : जीएसटीनंतर इंर्पोटेड वाद्यांच्या किमंतीत 8 ते 10 टक्के घट झाली. हॉमोनियमवरील कर कमी झाल्याने त्यांच्या किमंती उतरल्या परिणामी यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. लग्नसराईत मोठ्या तालवाद्यांंची मागणी अधिक वाढते. वस्तू आणि सेवा करप्रणाली जशी लोकांना समजेल तसे मार्केट वाढत जाईल तशी विक्री वाढेल.अद्याप ग्राहकांमध्ये जीएसटीबद्दल अनभिज्ञता दिसून येते त्यामुळे संभ्रमाची स्थिती कमी होतात बाजार वधारेल.
केतन छत्रिशाह, वाद्य विक्रेते

LEAVE A REPLY

*