Type to search

नंदुरबार फिचर्स

लग्नाला नकार दिल्याने मुलीच्या वडिलांची हत्या

Share

48 तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

नंदुरबार 

लग्नाला नकार दिल्याने तरुणाने मुलीच्या वडीलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघड झाले आहे. श्रावणी ता.नवापूर येथे दोन दिवसांपुर्वी झालेल्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला 48 तासात यश आले आहे. खून करणारा व्यक्ती हा मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून सध्या तो नाशिक येथील एका कंपनीत कामाला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.23 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी खांडबारा येथील भटूलाल काशिनाथ परदेशी यांचे श्रावणी शिवारात शेती असून शेतात ते घर बांधून शेतातील सागाच्या लाकडांची रखवाली करण्यासाठी रात्री मुक्कामी राहत होते. मुलीच्या विवाहासाठी दि.24 फेब्रुवारी 2020 रोजी एक स्थळ येणार होते, त्यासाठी त्यांचा मुलगा मिलींदकुमार हा त्यांच्या वडीलांना घेण्यासाठी शेतात आला असता, वडील शेतातील घरात, शेतात व आजुबाजुच्या परीसरात कुठेही दिसून आले नाही. घराच्या मागील पडसाळीत जावून बघितले असता त्यांचे वडील रक्तबंंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या डोक्यावर व चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली होती.

तसेच त्यांच्या खाटेवर, भिंतीवर व जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. रक्ताने माखलेला दगडही पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप-विभागीय पोलीस अधीकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना सूचना देवून घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन घटनास्थळावरुन मयताला मारण्यासाठी वापरण्यात आलेला रक्ताने माखलेला दगड व इतर महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. मयताचा मुलगा मिलींदकुमार भटुलाल परदेशी याच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुध्द् खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

याबाबत पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार केले. शेताच्या आजु-बाजुला असलेल्या रखवालदारांची विचारपूस, मयताचे कोणाशी भांडण झाले होते अगर कसे किंवा शेताच्या बांधावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेले सागाचे लाकुड चोरी करण्याच्या उद्देशाने खून करण्यात आला आहे काय याबाबत चौकशी करण्यात आली. परंतु काही एक उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती, नवले यांनी मयताच्या परीवारातील सदस्यांची विचारपूस सुरु केली. त्याचदरम्यान मयताच्या मुलीचा नाशिक येथील कंपनीत काम करणारा सहकारी अधुनमधुन त्यांच्या घरी येत होता 4 ते 5 दिवस थांबत देखील होता. म्हणून मयताच्या मुलीच्या सहकार्‍यावर संशय आला.

नवले यांनी तात्काळ नाशिक येथे संशयीत सहकार्‍याचा शोध घेण्याकामी पथक रवाना केले. दरम्यान, काल दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री नाशिक येथील पाथर्डीफाटा परीसरातील दामोदरनगर येथे संशयीत सहकारी एका अ‍ॅसॉर्ट नावाच्या ऑनलाईन खरेदी विक्रीच्या कंपनीत काम करुन राहत असल्याची माहिती मिळाली. खात्री करण्यासाठी पथक परीसरात गेले असता एका इमारतीत कंपनीत काम करणारे 400 ते 500 पुरुष राहत होते. माहितीची जुळवाजुळव करुन पथकाने गुन्ह्यातील संशयीत देवदत्त उदयविरसिंग (वय-27, रा. कादरवाडी सोसे ता.जि. कासगंज उत्तर प्रदेश ह.मु. नरहरी नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यास नरहरी नगर येथून त्याच्या मित्राच्या घरी झोपलेला असतांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!