Video : एकलहरेला जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

0

नाशिकरोड : एकलहरेमध्ये अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ही महिला म्हसरूळ परिसरातील असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सोमवारी रात्रीपासून ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह आज पहाटे एकलहरे शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी तिच्या कपड्यांवरून व अन्य काही वस्तूवरून तपासाची चक्रे फिरविली दुपारी एक वाजेच्या सुमारास युवती म्हसरूळ भागातील असल्याचे तपासात समजले.

मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना मृतदेह दाखविल्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटली.  या युवतीचे नाव पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नसून तपासाचा भाग म्हणून काही माहिती गुप्त ठेवली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

या आठवड्यातील हा तिसरा खून असल्यामुळे शांतता आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे युद्धपातळीवर तपासकार्य सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

*