Thursday, May 2, 2024
Homeजळगावमाजी महापौर पुत्राचा खून

माजी महापौर पुत्राचा खून

जळगाव – Jalgaon :

माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा बुधवारी मध्यरात्री 11.30 च्या सुमारास धारदार शस्राने वार करीत खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आरोपी पलायनाच्या प्रयत्नात असतानाच दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असले तरी शहरातील शांत झालेले गँगवार पुन्हा एकदा उफाळून आल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास असलेले माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश हा बुधवारी रात्री मित्रांसोबत फिरत असताना नाथजोगी समाजाच्या स्मशानभूमीजवळ त्याच्यावर धारदार शस्रांसह हल्ला करण्यात आला. यावेळी राकेशच्या पोटात सपासप वार झाल्याने तो जागेवरच कोसळला.

यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी ही घटना त्याचे वडील अशोक सपकाळे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत राकेशला डॉ. अर्जुन भंगाळे यांच्या दवाखान्याशेजारी असलेल्या ओम क्रिटिकल येथे उपचारासाठी दाखल केले.

याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. याप्रकरणी जैनाबादमधील लाडू गँग म्हणून कुप्रसिध्द असलेल्या गणेश व विशाल नावाच्या दोघे युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, रात्री दीड वाजता राकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. परंतु, ते कोविड सेंटर असल्याने 2 वाजता मृतदेह गोदावरीत हलविण्यात आल्याचे समजते.

दसर्‍याच्या दिवशी झाला होता वाद

राकेश व युवकांमध्ये दसर्‍याच्या दिवशीदेखील वाद झाल्याची माहिती असून यावेळी त्यांच्यातील वाद शांत करण्यात आला होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वैर असल्याचे बोलले जात असून त्याची परिणीती आजच्या घटनेत झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या