पेठला युवतीचा खून?

0
नाशिक |  जंगलामध्ये जनावरे चारण्यासाठी गेलेली 17 वर्षीय युवती विष पिलेल्या स्थितीत आढळून आल्याचा प्रकार पेठ तालु्नयात घडला. आज उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाल. दरम्यान सदर युवतीस 2 अज्ञात युवकांनी जबरदस्तीने विष पाजल्याचा आरोप युवतीच्या वडिलांनी केला आहे.
कविता वामन भांगरे (17, रा. डोंगरसेत, ता. पेठ) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (दि.21) दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. बैलपोळ्याच्या दिवशी ही युवती घरचे बैल व जनावरे चारण्यासठी जंगलात गेली होती. तीच्या कुटुंबियांनी तीचा शोध घेतला असता ती विषारी औषध पिलेल्या स्थितीत आढळून आली. तीला तातडीने हरसूल प्राथमिक आरोेग्य केंद्रामार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तीच्यावर उपचार सुरू असताना आज सायंकाळी तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. दरम्यान सदर युवतीस जंगलात 2 अज्ञात युवकांनी बळजबरीने विषारी औषध पाजून सदर युवक फरार झाल्याचे तसेच तीचा खून केल्याचा आरोप तीचे वडील वामन भांगरे यांनी केला आहे.
या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. ही आत्महत्या की खून याचा सर्व बाजूने पोलीस तपास करत असल्याचे हरसुलचे पोलीस निरिक्षक घुगे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*