गारगोटी तस्करीतून हत्या प्रकरणी तीन आरोपींना 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

0

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील सावरगाव येथून जाणार्‍या नगर-कल्याण रस्त्यावरील काळेवाडी येथे विहिर खोदत असताना सापडलेल्या गारगोटी तस्करीतून राजन सुरेंद्र शेटे (रा. राहुरी) या युवकाची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असताना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पारनेर तालुक्यातील काळेवाडी (सावरगाव) येथील विनोद दत्तात्रय गोडसे यांच्या विहिरीत गारगोटी खाण सापडली होती. गारगोटीच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून राहुरी येथील तरूणाची हत्या केली. ही घटना 28 जुलै रोजी रात्री 9 वाजता घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अशोक सिताराम खेवरे (रा. देसवंडी), कैलास मारूती कुसमुडे (रा.वांबोरी) व सचिन प्रकाश क्षीरसागर (रा. जोगेश्वरी आखाडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

*