Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेपची शिक्षा

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – भररस्त्यात पत्नीवर चाकू हल्ला करून खून करणारा पती शिवराम बापू तागडकर (वय- 65 रा. वडारवाडी, भिंगार) याला जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आरोपी शिवराम तागडकर व्यसनी असल्याने त्याची पत्नी सुमन तागडकर ही तीन मुलासह भिंगार येथील वडारवाडी येथे रहात होती. आरोपी आलमगीर भागात राहत होता. 9 नोव्हेंबर 2012 ला मयत सुमन शेजारील मैत्रिणीसोबत भिंगार येथील आठवडे बाजारात गेली होती.

बाजारातून घरी परत येताना सायंकाळच्या सुमारास हंटर रोड जवळील पोलीस लाईन येथे आरोपीने पत्नीला अडवून शिवीगाळ करत चाकू हल्ला केला. उपचारादरम्यान पिडीत महिलेचा मृत्यू झाला. मयत महिलेचा मुलगा अमोल तागडकर याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी गुन्हाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या समोर पूर्ण झाली. सरकारी पक्षातर्फे एकुण साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा तसेच तसेच दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, भादवि 201 नुसार एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!