नणंदेचा भावजयीने केला खून

0

अकोले तालुक्यात नणंदेचा खून

भंडारदरा (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील बारी (जहागिरदार वाडी) येथेे नणंदेचा एका तरुणाच्या मदतीने भावजयीनेच गळा दाबून खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मयत फसाबाई गोगा खाडे हिची वहिनी अनिता सखाराम खाडे अनिताला वर्तणुकीमुळे फसाबाईच्या कुटुंबीयांकडून तंबी मिळाली होती, फसाबाईमुळेच आपले बिंग फुटले असून तीचा काटा काढण्याचे अनिताने एका तरुणाला सांगितले होते. मयत फसाबाई बारी येथील महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत होती .
नवरात्रोत्सवातील सातव्या माळीला फसाबाई सकाळी साडेसात वाजता कॉलेजला निघाली असता वाटेतच नामदेव तुकाराम खाडे व त्याचा मित्र गणेश रोहिदास खाडे तिच्या जाण्याच्या रस्त्यावर दबा धरून बसले व टप्प्यात येताच फसाबाईवर झडप घालत गळा दाबून खून केला व मृतदेह गोणीत घालून घनदाट जंगलात दूरवर एका कपारीत ठेवला.
नामदेव हा मागिल वर्षी शेळ्या चारण्याचे काम करत असल्यामुळे त्याला परिसरातील जंगलाची माहिती बर्‍यापैकी झालेली होती. म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नामदेवने बनाच्या जाळीत एका दगडाच्या कपारीत एका गोणीत फसाबाईचा मृतदेह ठेवून टाकून दिला व ते दोघे निघून गेले .
सातव्या माळेलाच राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला असल्यामुळे राजूर पोलिसस्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक उजगरे यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत संशयित आरोपींना पकडले असता नामदेव तुकाराम खाडे (25) व गणेश रोहिदास खाडे यांना पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी गुन्हा कबुल केला व फसाबाईचा मृतदेह जंगलात दूरवर साधारण तीन किमी अंतरावर एका कपारीत ठेवला आहे याची माहिती दिली.
राजूर पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन जंगलातून कपारीत दडवलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी दिला. या खुनाचा तपास डिवायएसपी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत जाधव तसेच सहायक उपनिरीक्षक अशोक उजगरे, नितिन सोनवणे, किशोर तळपे, सुरेश कदम, प्रवीण थोरात, राजेंद्र वाकचौरे आणि संगीता आहेर हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

*