मुलीच्या खूनप्रकरणातील आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी

0
भंडारदरा (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील बारी येथील अल्पवयीन मुलीच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या त्या तीन आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
27 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर बारी( जहागीरदारवाडी) येथील फसाबाई खाडे (17) या अल्पवयीन मुलीचा नामदेव खाडे आणि गणेश खाडे या दोघांनी गळा दाबून खून केल्याच्या आणि हा कट करण्यासाठी सांगितलेल्या अनिता खाडे यांना येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक अशोक उजागिरे आणि त्यांच्या पोलिस कर्मचार्‍यांनी मंगळवारी अटक केली होती.
.बुधवारी या आरोपींना अकोले येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने या आरोपींना नऊ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती स.पो. नि भरत जाधव यांनी दिली.
पुढील तपास पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक उजागिरे करत आहेत.

LEAVE A REPLY

*