हत्याकांडाच्या निषेधार्थ शेवगावात कडकडीत बंद

0
हरवणे यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन करतांना पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे समवेत बापुसाहेब पाटेकर, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा व इतर.

पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट देवून केले सांत्वन; चारही मयतावर अंत्यसंस्कार

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील विद्यानगर येथे माजी सैनिकाच्या कुटुंबातील चार जणांच्या हत्येच्या निषेधार्थ व आरोपीचा तपास लावण्याच्या मागणीसाठी शेवगाव शहर कडकडीत बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली. दरम्यान पालकमंत्री राम शिंदे यांनी घटनास्थळी हरवणे यांच्या मुलीची व वडूले येथे त्यांच्या आई व भावांची भेट घेवून सांत्वन केले. पालकमंत्री शिंदे यांनी केले. या हत्याकांडातील चारही मयतावर काल सायंकाळी 5.15 वाजता एकाचवेळी वडूले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अप्पासाहेब हरवणे यांचे बंधू भाऊसाहेब हरवणे यांनी अग्नीडाग दिला.
शनिवार दि. 18 च्या काळरात्रीच्या अंधारात अप्पासाहेब हरवणे, सुंनदा हरवणे, स्नेहल हरवणे, मकरंद हरवणे या चौघांची मारेकर्‍यांनी निर्घुणपणे हत्या केली. याच पार्श्वभुमीवर पालकमंत्री राम शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत अप्पासाहेबांच्या आई गोपिकाबाई, भाऊ भाऊसाहेब, बहिणी आशाबाई सोनवणे, व्दारकाबाई कर्जुले, छायाबाई सपकाळ, चुलते मुरलीधर यांचे वडुले बु. येथे जाऊन भेट घेऊन सांत्वन केले. ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधत आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली. आरोपी पकडले जातील असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, तहसीलदार दीपक पाटील, पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
घटनेचा निषेध म्हणुन शेवगावकरांनी कडकडीत बंद पाळुन आरोपीच्या अटकेची मागणी केली. शहरातील सर्व दुकाने, शाळा-महाविद्यालयांतुन या घटनेतील मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहुन शाळाही बंद ठेवण्यात आल्या. क्रांती चौकात वडुले येथील नागरिक तसेच शहरातील नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली. यावेळी अरुण लांडे, काकासाहेब नरवडे, कॉ. शशिकांत कुलकर्णी, अ‍ॅड. सुभाष लांडे, संजय नांगरे, बापुसाहेब पाटेकर, भिमराज सागडे, अरुण मुंढे, अशोक आहुजा, कचरु चोथे, गणेश रांधवणे, गंगा खेडकर यांच्यासहित शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
सायंकाळी 5.15 वाजता हत्याकांडातील चारही मृतदेहावर वडुले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

  ही घटना दुर्दैवी आहे. शवविच्छेदनास उशीर झाला आहे मात्र तपासाच्या दृष्टीने ते व्यवस्थित होणे महत्वाचे आहे. अशा घटना समाजाला घातक आहेत. आरोपींचा बंदोबस्त करणे व आरोपी पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. मी पोलीस अधिक्षकांना तपासा संदर्भात सर्व सूचना दिल्या आहेत. तुम्हाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांना द्या. आरोपी पकडले तरच खर्‍या अर्थाने न्याय मिळणार आहे. या कुटुंबाच व या मुलीच दु:ख मोठे आहे. या कुटुंबाचे नुकसान कधीही न भरुन येणारे आहे.  ही घटना दुर्दैवी आहे. शवविच्छेदनास उशीर झाला आहे मात्र तपासाच्या दृष्टीने ते व्यवस्थित होणे महत्वाचे आहे. अशा घटना समाजाला घातक आहेत. आरोपींचा बंदोबस्त करणे व आरोपी पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. मी पोलीस अधिक्षकांना तपासा संदर्भात सर्व सूचना दिल्या आहेत. तुम्हाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांना द्या. आरोपी पकडले तरच खर्‍या अर्थाने न्याय मिळणार आहे. या कुटुंबाच व या मुलीच दु:ख मोठे आहे. या कुटुंबाचे नुकसान कधीही न भरुन येणारे आहे. – ना. राम शिंदे

LEAVE A REPLY

*